Mumbai Corona Update: मुंबईचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर, मृत्यूसंख्येतही घट

Mumbai Corona Update: मुंबईचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर, मृत्यूसंख्येतही घट

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती रिकव्हर होण्याकडे आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या व मृत्यूसंख्याही कमी होताना दिसत आहे. आजही मुंबईतील रुग्णसंख्येत आणि मृत्यूसंख्येच घट झाली आहे. मुंबईत आज २ हजार ५५४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९० टक्के इतका झाला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर काहीच दिवसात मुंबई कोरोनामुक्त होईल. आज मुंबईत ५ हजार २४० जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत ५ लाख ९४ हजार ८५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दरही कमी झाला आहे. मुंबईत २७ मार्च ते ३ एप्रिलपर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.५८ टक्के इतका आहे. तर मुंबईत आज ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या १३ हजार ४७० इतकी आहे. मुंबईत आज २९ हजार ७६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये काहीशी वाढ झाली आहे. मुंबईत सध्या ९८ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. ७५३ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

मुंबई आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे मुंबईतील लसीकरण प्रक्रियाही चांगलाच जोर धरणार आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत केवळ खासगी, सरकारी आणि पालिकेने सुरु केलेल्या रुग्णालयातच लसीकरण केले जात होते. मात्र आता मुंबईतील खासगी सोसायट्यांमध्येही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी पालिकेला परवानगीही देण्यात आली आहे. हाऊसिंग सोसायट्या, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, बँका आणि कॉर्पोरेट्स क्षेत्रातील कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी खासगी रुग्णांसह टायअप करत खाजगी लसीकरण केंद्र सुरु करु शकतात, असे मुंबईचे पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – Covid-19 बाधित १००१ मातांची सेफ डिलिव्हरी, नायर हॉस्पिटलचा नवा विक्रम

 

 

First Published on: May 4, 2021 8:29 PM
Exit mobile version