Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, ७०१ रुग्णांची कोरोनावर मात

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, ७०१ रुग्णांची कोरोनावर मात

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर, गेल्या २४ तासात ३५१ कोरोनबाधितांची नोंद

मुंबईतील कोरोन परिस्थिती हळूहळू आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५०० च्या आतमध्ये आली आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवसात मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५०० च्या आतमध्ये झाली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत फक्त ४७८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामुळे पालिका प्रशासन आणि राज्य सरकारला कोरोना नियंत्रणामध्ये यश मिळत असल्याचे दिसते आहे. मुंबईत गेल्या २४ तासात कोरोनाबाधित संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ७०१ म्हणजेच जास्त आहे. सध्या मुंबईत एकूण ७ हजार १२० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७ लाख २८ हजार १७४ इतका झाला आहे. तर आतापर्यंत ७ लाख ३ हजार ७७ कोरोनाबाधित रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनाच्या संकटात एकूण १५ हजार ६३६ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तरी मुंबईचा समावेश हा तिसऱ्या टप्प्यातच करण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन खबरदारीची भूमिका घेत असल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्या नाहीत. केवळ तिसऱ्या टप्प्यातील सुविधा या मुंबईतील नागरिकांना दिल्या आहेत.

मुंबईतील कोरोनाबिध रुग्णांचा बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर गेला आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात २७ हजार ८२७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ७५ लाख ६२ हजार ४०१ कोरोनाबाधितांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत मृत्यू झालेल्या ९ रुग्णांपैकी ७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ पुरुष व २ रुग्ण महिला होत्या. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर हा ९२६ दिवसांवर गेला आहे.

First Published on: July 12, 2021 8:21 PM
Exit mobile version