Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईत कोरोना रूग्णांचा आकडा एक हजाराच्या खाली, तर १,२३९ जण कोरोनामुक्त

Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईत कोरोना रूग्णांचा आकडा एक हजाराच्या खाली, तर १,२३९ जण कोरोनामुक्त

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर, गेल्या २४ तासात ३५१ कोरोनबाधितांची नोंद

मुंबईकरांनी दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रूग्णांचा आकडा एक हजाराच्या खाली नोंदवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत अशाच प्रकारे रुग्णसंख्या कमी झाल्याचे पहायला मिळाले होते. त्याचप्रमाणे आज मुंबईत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या कालच्या तुलनेत अधिक आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ९२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जवळपास ८ ते १० दिवसांनी मुंबईत इतकी कमी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. मुंबई पुन्हा एकदा रिकव्हरीकडे वाटचाल करत असल्याचे म्हणायला हरकत नाही. असे असले तरी आज मुंबईत ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आजची मृत्यूसंख्या काही अंशी कमी झाली आहे. (Mumbai Corona Update: number of corona patients is less than one thousand in Mumbai, 1,239 corona free)


मुंबईत गेल्या आठवडाभरापासून कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या अधिक नोंदवण्यात येत होती. आज मात्र बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत आज १ हजार २३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६ लाख ५८ हजार ५४० इतकी झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट ९४ टक्के इतका आहे. मुंबईचा २१ मे ते २७ मे पर्यंतचा विचार केला असता मुंबईत रुग्ण वाढीचा दर हा ०.१८ टक्के इतका झाला आहे.

मुंबईची आकडेवारी कमी होत असली तरी मुंबईकरांनी आणखी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कारण मुंबईत अद्याप २७ हजार ९५८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत सध्या ४१ अँक्टिव्ह कंटेनमेंट झोन आणि १७५ अँक्टिव्ह सीलबंद इमारती आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आणखी कालावधीची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन पुढील १५ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. त्यासंबंधीची नवीन नियमावली १ जून रोजी लागू करण्यात येणार आहे.


हेही वाचा – Pune Corona Update: पुण्यातील होम आयसोलेशनचे प्रमाण झाले कमी – राजेश टोपे

 

 

First Published on: May 28, 2021 8:00 PM
Exit mobile version