Mumbai Corona Update: मुंबईत बुधवारी १ हजार ५३९ नव्या रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत बुधवारी १ हजार ५३९ नव्या रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update : कोरोनाच्या चौथ्या लाटेला निमंत्रण, मुंबईत एका दिवसात ९६१ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाचा पुन्हा उद्रेक पाहायला मिळत आहे. रोज १ हजारांच्या घरा नवे कोरोना एकट्या मुंबईत सापडत आहेत. यात आज कोरोना ५०० हून अधिक रुग्णांची भर पडली आहे. आज बुधवारी मुंबईत १ हजार ५३९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत ३ लाख ३७ हजार १२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत आज ८८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले परतले आहेत. त्यामुळे मुंबईत आज रुग्ण बरे होणाच्या प्रमाणातही घट झाली. आत्तापर्यंत मुंबईत ३ लाख १३ हजार ३४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या मुंबईत ११ हजार ३७९ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत ११ हजार ५११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

मुंबईचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९३ टक्के इतका आहे. २ मार्च ते ९ मार्च पर्यंत मुंबईत कोरोना वाढीचा दर हा ०.३२ टक्के इतका आहे. ९ मार्च पर्यंत मुंबईत एकूण ३४ लाख ७५ हजार ७४४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईत २५ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर मुंबईत २२९ इमारती सील बंद आहेत. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे.यातच झोपडपट्ट्यांच्या तुलनेत इमारतींमध्ये रुग्ण वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहेत.  इमारतींमध्ये कोविडचे 90 टक्के रुग्ण आढळल्याने आता महानगर पालिकेने अधिक आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

 

First Published on: March 10, 2021 9:51 PM
Exit mobile version