KP Gosavi Arrested : किरण गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक

KP Gosavi Arrested : किरण गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक

KP Gosavi Arrested : किरण गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक

मुंबई क्रूझ ड्र्ग्स प्रकरणी शाहरुखनाचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. मात्र या प्रकरणाला रोज नवे वळण मिळताना दिसतेय. याप्रकरणातील साक्षीदार (पंच) किरण गोसावीवर त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने वसुलीचे आरोप केले आहे. तर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील गोसावीविरोधात फसवणूकीचे आरोप केले. मात्र तेव्हापासून फरार असलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. किरण गोसावीने सरेंडर केलं नसून त्याला इंटलिजेंसच्या आधारे अटक केल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. पुणे पोलिसांकडून त्याच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

यानंतर आज ११ वाजता पोलिसांकडून किरण गोसावीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.आज पहाटे गोसावीच्या अटकेची प्रक्रिया सुरु झाली. तसेच त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय एनसीबीकडूनही त्याची चौकशी होणार आहे.

प्रभाकर साईल आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील एक पंच आहे. तर दुसरा पंच किरण गोसावी याचा तो बॉडीगार्ड म्हणून देखील काम करत होता. मात्र प्रभाकर साईलने जेव्हा के.पी गोसावीवर या प्रकरणात पैसे घेतल्याचे आरोप केले तेव्हापासून गोसावी फरार होता. तो लखनऊमध्ये असल्याची माहिती त्यानंतर समोर आली होती. पंच प्रभाकर साईलच्या गौप्यस्फोटानंतर पंच गोसावीची या प्रकरणातील अटक निश्चित होती. पुणे पोलिसांच्या एक पथकाने गोसावीला अटक करण्यासाठी लखनऊ गाठले आणि त्याला ताब्यात घेतले. गोसावीवर आत्तापर्यंत चार विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणांचा देखील तपास सुरु आहे. फसवणूकीप्रकरणी गोसावीविरोधात पुणे पोलिसांत पुन्हा दाखल आहे.

दरम्यान गोसावीच्या अटकेआधी त्याची एक ऑटिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये तो लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र लखनऊ पोलिसांना गोसावीला अटक करण्यासाठी विरोध दर्शवला.तसेच इतर ठिकाणी सरेंडर होण्याचा सल्ला लखनऊ पोलिसांनी दिला होता. मात्र गोसावी लखनऊमध्ये लपून बसल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळताच पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊला रवाना झाले होते. त्यानंतर अखेर गोसावीला अटक करण्यात आली आहे.


 

First Published on: October 28, 2021 8:10 AM
Exit mobile version