मुंबईत सवतींनी मिळून दारु पिणाऱ्या नवऱ्याला केले ठार

मुंबईत सवतींनी मिळून दारु पिणाऱ्या नवऱ्याला केले ठार

दामदुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून ठाण्यात गुंतवणूकदारांना गंडा

दारू पिऊन छळ आणि शिवीगाळ करणाऱ्या दारुड्या पतीच्या छळाला कंटाळलेल्या सवतींनी एकत्र येत पतीची हत्या केल्याची घटना गोरेगावमधील बांगुर नगर येथे घडली आहे. राजू वाघमारे असे मृत पतीचे नाव आहे. उशीच्या सहाय्याने श्वासोच्छवास रोखून त्या दोघींनी पतीची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. रात्री १२.३० ते १ या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान मृत राजू वाघमारे याच्या भावाने बांगुर नगर पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर बांगुर नगर पोलिसांनी त्या दोघींना ताब्यात घेतले आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दारुच्या नशेत घरी आलेल्या राजू वाघमारे याने त्याच्या दोन पत्नींना शिवीगाळ तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. सततच्या छळाला कंटाळून त्याच्या दोन्ही पत्नींनी एकत्र येत उशीच्या सहाय्याने त्याचे तोंड दाबले. यावेळी गुदमरुन राजू वाघमारे याचा मृत्यू झाला. राजूच्या मृत्यूची बातमी कळताच त्याचा भाऊ विनोद याने बांगुर नगर पोलिसांत धाव घेतली. दरम्यान मृत राजू वाघमारेचे शव शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on: December 6, 2019 9:09 AM
Exit mobile version