मुंबईत डॉक्टरांना ठेवण्यात आलेल्या ‘हॉटेल फॉर्च्युन’मध्ये आग; २५ डॉक्टर सुखरूप

मुंबईत डॉक्टरांना ठेवण्यात आलेल्या ‘हॉटेल फॉर्च्युन’मध्ये आग; २५ डॉक्टर सुखरूप

मुंबईत डॉक्टरांना ठेवण्यात आलेल्या 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर्स सुखरूप

मुंबईतील धोबी तलाव परिसरात मेट्रो सिनेमा या चित्रपटगृहाजवळ असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. या हॉटेलमध्ये साधारण २५ डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्याला आग लागल्यामुळे परिसरात धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. या हॉटेलमध्ये डॉक्टर्स वास्तव्याला असल्याने एकच खळबळ उडाली.

या आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि ४ जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. चौथ्या मजल्यावर अडकलेल्या डॉक्टर्सना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ जवानांनी शिडीच्या मदतीने या सर्व डॉक्टरांना सुखरुप वाचवले असून बचावकार्य संपल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

२५ निवासी डॉक्टरांचा जीव वाचवण्यात यश

मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार २५ निवासी डॉक्टरांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

सध्या या सर्व डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था ट्रायडंट हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान स्थानिक लोकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे सांगण्यात येत आहे.


वांद्रे येथून करोनाचे विषाणू सांताक्रूझमधे स्थिरावले

First Published on: May 28, 2020 7:58 AM
Exit mobile version