अग्निशमन दलाकडून इमारतींची झाडाझडती, १५१ इमारतीमध्ये गंभीर त्रुटी

अग्निशमन दलाकडून इमारतींची झाडाझडती, १५१ इमारतीमध्ये गंभीर त्रुटी

मुंबई अग्निशमन दलाने नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत अग्निप्रतिबंधक उपाययोजनांबाबत मुंबईतील ३२९ इमारतींची झाडाझडती घेतली. त्यामध्ये, १५१ इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांत गंभीर त्रुटी आढळून आल्याने सदर इमारती मालक व रहिवाशांना तात्काळ नोटीसा बजावण्यात आल्याने आजूबाजूच्या इमारती, सोसायटया यांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून इमारतींमध्ये आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याची गंभीर दखल मुंबई अग्निशमन दलाने घेतली. शहर व उपनगरे येथील इमारती, उंच टॉवर या ठिकाणी नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीत झाडाझडती घेतली. त्यावेळी ३२९ इमारतींपैकी, १५१ इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांत गंभीर त्रुटी असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा गंभीर प्रकार म्हणजे इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांच्या निदर्शनास आले.

भविष्यात अशा इमारतीमध्ये एखादी घटना घडल्यास मोठी जीवित व वित्तीय हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अग्निशमन दलाने संबंधित ३५१ इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीस दिल्यानंतर १२० दिवसांत अग्निप्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब यांनी दिली.

First Published on: May 12, 2022 10:22 PM
Exit mobile version