अंधेरी आग दुर्घटना; ही आहेत जखमींची नावे

अंधेरी आग दुर्घटना; ही आहेत जखमींची नावे

अंधेरी आग दुर्घटना

अंधेरी मधील मरोळ येथे कामगार रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अंधेरीच्या कामगार रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत एकूण १४७ लोक जखमी झाले आहेत. तर या घटनेमध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सेव्हन हिल्समध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांचा कुपर रुग्णालयात मृत्यू झाला आहे, तर एकाचा होली स्पिरीट रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर कूपर रुग्णालयामध्ये एकूण ४ जण गंभीर जखमी असून त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना आयसीयू विभागात दाखल करण्यात आले आहे. तर पाच लहान बाळांना होली स्पिरीट रुग्णालयामध्ये एन आयसीयू मध्ये दाखल केलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी अनेकांना धूराचा त्रास झाला आहे.

तसेच ३५ जणांना हॉली‌ स्पिरीट रुग्णालयामध्ये दाखल केलं असून इथल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच नवजात बाळाला इथे आणण्यात आले असून एक नवजात बालकाचा मृतदेह आणण्यात आला होता.

कुपर रुग्णालयामध्ये चार रुग्ण दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या रुग्णांपैकी एकाच्या पाठीच्या कण्याला मार लागला आहे. त्याने स्वत: चा जीव वाचविण्यासाठी उडी मारली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जखमींमध्ये एका अग्निशमन दलाच्या जवानाचा ही समावेश आहे. तर दुसऱ्या रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये दाखल केलं आहे. तर एकाच कुटुंबातील चार जण या घटनेमुळे कुपर रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यापैकी दोघं वडील निकृती कांबळे (६०) आणि मुलगी पूनम कांबळे यांना पोटदुखीच्या कारणामुळे कुपरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यांच्या कुटुंबातील सर्वच जण धूराचा त्रास आणि पोटदुखीमुळे वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. तर, कुपर रपग्णालयामध्ये दोन अनोळखी मृतदेह दाखल झाले आहेत. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पण त्यांच्या शरीरावर जखमा नसून त्यांना धूराचाच त्रास झाला आहे.  – डॉ. राजेश सुखदेवे, कुपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी


वाचा – Breaking news : अग्नितांडवात ६ जणांचा मृत्यू; १४७ जण जखमी; ८ जणांची प्रकृती गंभीर


 

First Published on: December 17, 2018 9:50 PM
Exit mobile version