जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी धावणार मुंबईची लाईफलाईन!

जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी धावणार मुंबईची लाईफलाईन!

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यसरकार मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार करत आहे. तसेच यासंदर्भात तयारीदेखील सुरू झाली आहे. दरम्यान जानेवारीपासून मुंबई लोकलचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्याचा विचार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हटले आहे. मुंबई लोकल सर्वसामान्य मुंबईकरांसाठी कधी सुरु होणार, असा प्रश्न सध्या सर्वत्र उपस्थितीत असतातना अशा परिस्थितीत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. विधानभवनामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितले की, “आता मुंबई आणि महाराष्ट्राची परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनसंबंधी लवकरच निर्णय होणार आहे. थोडा वेळ जाईल आणि जानेवारीत लोकल ट्रेन सुरु करण्यात काही अडचण येणार नाही असे मला वाटतं.” पुढे ते म्हणाले की, “एकूण घटती रुग्णसंख्या, रुग्ण बरं होण्याचे प्रमाण तसंच कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती गेली आहे. ३१ डिसेंबरनंतर नवीन वर्ष सुरु झाले की ट्रेनला पुन्हा रुळावर आणू आणि सर्वसामान्यांची सेवा सुरु होईल”.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्यानं वकील, शिक्षक आणि महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास कधी सुरू होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यावेळी लोकलमधील गर्दीवर नियंत्रण कसं ठेवणार यासंबंधी त्यांनी विचारले असता, ते म्हणाले लोकलमधील गर्दीवर नियंत्रण कसं ठेवणार यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोरोना सध्या नियंत्रणात आहे. दिल्लीत थंडी आणि गर्दीमुळे कोरोना रुग्ण अचानक वाढले आहेत. तशीच परिस्थिती मुंबईत उद्भवू नये यासाठी पुढचे १५ दिवस नियोजन आणि चर्चा केली जाणार आहे. मास्क न घालता कोणी ट्रेनमध्ये चढू नये, गर्दी कमी करण्यासाठी नियोजन, पोलीस तसंच इतर मनुष्यबळाची मदत या सगळ्या गोष्टींची चाचपणी पूर्ण झाली आहे. तयारी पूर्ण झाली आहे. नवीन वर्षात पहिल्या तारखेपपासून लोकल सुरु करण्यासंबंधी विचाराधीन आहे”.

First Published on: December 15, 2020 11:16 AM
Exit mobile version