ज्या क्षणी ठाकरे सरकार सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करु – रावसाहेब दानवे

ज्या क्षणी ठाकरे सरकार सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करु – रावसाहेब दानवे

ज्याक्षणी राज्य सरकार सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ असी प्रतिक्रिया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. राज्यात ब्रेक दी चैन अंतर्गत मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मुभा नाही आहे. त्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करत जनतेला दिलासा दिला आहे. मात्र अद्यापही मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

राज्य सरकारने आता राज्याने निर्बंध शिथिल केल्याचा आधार घेत केंद्र सरकारला रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली तर आम्हाला काही अडचण नाही. राज्य आपली भूमिका जाहीर करत नाही तोवर केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण शेवटी राज्य कोरोना स्थिती हाताळत आहे, असं म्हणताना दानवे यांनी ज्या क्षणी ठाकरे सरकारनं सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करु असं सांगितलं.

मुंबई लोकलवर आज निर्णय?

लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारी मुंबईतील लोकल ट्रेन सेवा नेमकी कधी सुरू होणार, हे आज कळणार आहे. राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात त्याबाबत भूमिका मांडणार आहे. वकिलांच्या संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन लोकल प्रवासाची परवानगी मागितली होती. त्यावर, कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, असे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले होते. तसंच, लसीचे दोन डोस घेतलेल्या इतर नागरिकांचाही विचार व्हावा, अशी सूचना न्यायालयानं केली होती. राज्य सरकारनं त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आज याच संदर्भात राज्य सरकार सविस्तर भूमिका मांडणार आहे. त्यामुळं उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडं मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

 

First Published on: August 5, 2021 12:32 PM
Exit mobile version