Mega Block: मध्य रेल्वेवर १४ तासांचा मेगाब्लॉक; अनेक ट्रेन रद्द

Mega Block: मध्य रेल्वेवर १४ तासांचा मेगाब्लॉक; अनेक ट्रेन रद्द

मध्य रेल्वेवर (Central Railway) ठाणे (Thane) आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान (Diva Railway Station) जलद मार्गावर काल, शनिवारपासून ते आजपर्यंत १४ तासांत पायाभूत सुविधा ब्लॉक (Infrastructure Block) आहे. यादरम्यान ठाणे- दिवा स्टेशनदरम्यान अप जलद मार्गिकेवर २ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक ठाणे-दिवा दरम्यान ५व्या आणि ६ व्या संबधित जलद मार्गिकेसोबत जुनी मार्गिका जोडण्यासाठी आणि क्रॉसओवर सुरू करण्यासाठी असणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीनंतर १.२० मिनिटांनी डाऊन फास्ट मार्गिकेवर मेगाब्लॉकला सुरुवात झाली असून रविवारी दुपारी ३.२० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तसेच मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अप जलद मार्गिकेवरून दुपारी १२.३० मिनिटांपासून ते २.३० मिनिटांनी २ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. या १४ तासांच्या मेगाब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन दिशेला धिम्या मार्गिकेवर लोकल धावतील.

शनिवारी रात्री ११.४० मिनिटांनंतर रविवारी पहाटे २ वाजेपर्यंत दादरहून धावणारी डाऊन जलद उपनगरीय/मेल/एक्स्प्रेस ट्रेन डाऊन धिम्यालाईनवर माटुंगा आणि कल्याण दरम्यान धावतील. तसेच डाऊन मेल/ एक्स्प्रेस ट्रेन ठाणे स्टेशनवर थांबणार नाहीत. दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस न वळवता आणि नियोजित थांब्यासह डाऊन जलद मार्गिकेवर धावेल. रविवारी २३ जानेवारी रात्री १२ वाजल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनल्सहून धावणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस कल्याणकडे जाणाऱ्या गाड्या मुलुंड ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

मेगाब्लॉक सुरू झाल्यानंतरचा पॅटर्न

रेल्वेच्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसहून रविवारी पहाटे २ वाजल्यामुळे ब्लॉक पूर्ण होईपर्यंत धावणाऱ्या उपनगरीय/मेल/एक्स्प्रेस ट्रेन मुलुंड आणि कल्याणदरम्यान डाऊन धीम्या मार्गिकेवर वळण्याविण्यात येणार आहे. कल्याणला जाणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ट्रेन ठाणे स्टेशनवर थांबणार नाहीत. ठाण्याच्या प्रवाशांना दादर आणि कल्याण स्टेशनहून ट्रेनमध्ये चढण्यास परवानगी आहे. कोकणला जाणार डाऊन मेल एक्स्प्रेस ट्रेन ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक ७वर थांबतील.

या एक्स्प्रेस आज रद्द

२२१०५ / २२१०६ मुंबई – पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
२२११९ / २२१२० मुंबई – करमळी – मुंबई तेजस एक्स्प्रेस
११००७ / ११००८ मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
१७६१७ मुंबई – नांदेड तपोवन एक्स्प्रेस
१२०७१ / १२०७२ मुंबई – जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
११०२९ मुंबई – कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
१२१३९ मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस

पनवेल येथे थांबणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या..

१६३४६ तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस २१ जानेवारी रोजी सुटणारी
१२०५२ मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस २२ जानेवारी रोजी सुटणारी
१०११२ मडगाव – मुंबई कोकण कन्या एक्स्प्रेस २२ जानेवारी रोजी सुटणारी

पनवेलहून सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या..

१६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस २३ जानेवारी रोजी सुटणारी
१२०५१ मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस २३ जानेवारी रोजी सुटणारी
१०१०३ मुंबई – मडगाव मांडवी एक्स्प्रेस २३ जानेवारी रोजी सुटणारी

First Published on: January 23, 2022 10:04 AM
Exit mobile version