रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मेगाब्लॉक

सुट्टीच्या दिवसानिमित्ताने रेल्वे रुळांची देखभाल आणि इतर अनेक कामांसाठी मुंबई आणि उपनगरच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर आणि हार्बर मार्गावर वाशी ते कुर्ला मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे आज तीनही मार्गावरील लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे आजच्या सुट्टीच्या दिवशी जे प्रवासी घराबाहेर पडणार आहेत त्या प्रवाशांना मेगाब्लॉकचा फटका बसण्याची शक्यता असणार आहे.

ध्य रेल्वे

स्थानक – कल्याण ते ठाणे

मार्ग – अप जलद

वेळ – सकाळी १०. ५४ ते दुपारी. ३. ५२

परिणाम – ब्लॉककाळात अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे स्थानकाच्या पुढे लोकल पुन्हा जलद मार्गावरून धावतील. यामुळे लोकल २० मिनिटे आणि मेल-एक्स्प्रेस ३० मिनिटे विलंबाने असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हार्बर रेल्वे

स्थानक – वाशी ते कुर्ला

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ –काळी. ११.१० ते दुपारी. ३.४०

परिणाम – ब्लॉक काळात अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तथापि, सीएसएमटी – पनवेल किंवा वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर प्रवाशांना त्याच तिकीट, पासवर सकाळी १० ते दुपारी ४पर्यंत मुख्य आणि ट्रान्सहार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा असणार आहे.

पश्चिम रेल्वे

स्थानक – बोरिवली ते भाईंदर

मार्ग – अप आणि डाऊन जलद

वेळ –काळी. ११ ते दुपारी. ३

परिणाम – ब्लॉककाळात अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकल बोरिवली ते वसई रोड-विरार दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल विलंबाने धावतील.

First Published on: August 25, 2019 9:22 AM
Exit mobile version