मानवता हरवली: मजेसाठी मांजरांच्या पिल्लांना जाळलं

मानवता हरवली: मजेसाठी मांजरांच्या पिल्लांना जाळलं

मुंबईतील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाने मजेत मांजरींच्या तीन लहान पिल्लांना जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. तेथील राहणाऱ्या नागरिकांच्या नजरेस हा प्रकार पडला. यावेळी त्यांनी तीन मांजरींच्या पिल्लांना आगीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

३२ वर्षीय तरूणाला अटक

या प्रकरणी पिल्लांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यामधील एका पिल्लाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धेश पटेल असे या तरुणाचे नाव आसून याच्या विरोधात तेथील रहिवाशांनी गुन्हा दाखल केला. हा आरोप केल्यानंतर ठाणे ग्रामीण पोलिसांनी गुरूवारी या ३२ वर्षीय तरूणाला अटक केली.

 

नया नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक कैलाश बर्वे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी सिद्धेश पटेल या तरूणाने मजेसाठी मांजरींना जाळल्याचे समोर आले आहे. पटेल या तरूणावर आयपीसीच्या कलम ४२९ आणि प्राणी संरक्षण कायद्यानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सिद्धेशच्या इमारतीत राहणाऱ्या सदस्यांनी असे म्हटले की, सिद्धेश दोन दिवसांपूर्वी मांजरींना जाळण्याचा प्रयत्न करीत होती, पण सुदैवाने ते पळून गेले होते. ही संपुर्ण घटनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. त्या व्यक्तीने मजेकरिता मांजरींना आग लावली, परंतु मांजरांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आगीतून पळ काढला.

First Published on: May 3, 2019 3:57 PM
Exit mobile version