मुंबई महापालिकेला ‘जल निर्मलता राष्ट्रीय पुरस्कार’ 

मुंबई महापालिकेला ‘जल निर्मलता राष्ट्रीय पुरस्कार’ 

सैनिकांच्या मालमत्तांना मालमत्ता करात सूट देण्याचा प्रस्ताव लटकला

इंडियन वॉटर वर्क्‍स असोसिएशनचा ‘जल निर्मलता राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा मुंबई महानगरपालिकेला मिळाला आहे. पाणीपुरवठ्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे, पाण्याचा दर्जा सुधारून नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार मुंबई महापालिकेला मिळाला आहे. वरळी, करी रोड, शिवडी, मालाड, कांदिवली, जोगेश्वरी, पवई, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर येथील वस्त्यांमधून पाण्याचे नमुने घेण्यात आले होते.

९९.३४% पाणी शुद्ध

पंतप्रधान जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्राहक व्यवहार मंत्रालयातर्फे देशातील २१ शहरांमध्ये नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने गोळा करून ते ४७ मानकांच्या आधारे तपासण्यात आले. सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी महापालिकेचा मान मुंबई पालिकेला मिळाला आहे. पालिकेतर्फे दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो. २५० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या बदलल्या. त्याबरोबर १ लाख ७५ हजार ठिकाणची गळती शोधून दुरुस्ती केली. रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत ८९ हजार ९०८ सेवा जोडण्या बदलल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ९९.३४% पाणी अगदी शुद्ध स्वरूपातील आहे.

 

First Published on: March 22, 2021 9:08 PM
Exit mobile version