नाव एकाचे मतदान केले भलत्यानेच; जोगेश्वरीतील धक्कादायक प्रकार

नाव एकाचे मतदान केले भलत्यानेच; जोगेश्वरीतील धक्कादायक प्रकार

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात मनाई आदेश लागू

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी येथे बोगस मतदानाचा प्रकार समोर आला आहे. जोगेश्वरी येथे राहणाऱ्या प्रमिला परब श्री समर्थ विद्यालय या मतदान केंद्रावर आज सकाळी मतदानासाठी पोहोचल्या. बराच वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांचा नंबर लागला. मात्र त्यानंतर त्यांना धक्का बसणारी गोष्ट तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितली. प्रत्येक बुथवर मतदारांचे नाव आणि फोटोसहीत यादी असते. प्रमिला परब यांचे नाव ज्या बुथच्या यादीत होते, तिथे त्यांच्या नावावर आधीच मतदान झाले असल्याचे निदर्शनास आले. हे ऐकून परब कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला आहे.

प्रमिला परब यांचे मतदार ओळखपत्र

परब कुटुंबिय हे जोगेश्वरी येथील कोकण नगर परिसरात राहतात. प्रमिला परब यांचे पती पांडुरंग परब आणि मुलगा जीवाजी परब यांचे नाव जोगेश्वरीतील बालविकास शाळेतील मतदार यादीत आलेले आहे. प्रमिला परब यांचे नाव श्री समर्थ विद्यालय येथील मतदार केंद्रात आलेले आहे. आज परब कुटुंबिय आपापल्या मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचले होते. मात्र प्रमिला परब यांच्या नावावर आधीच मतदान झाले असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रमिला परब आणि त्यांच्या कुटुंबियांनी मतदान केंद्रावरील यादी तपासली असता दुसऱ्याच कुणीतरी प्रमिला परब यांच्या नावावर मतदान केले असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रमिला परब यांचा बुथ क्रमांक

 

या सर्व प्रकारानंतर प्रमिला परब यांचे चिरंजिव जीवाजी परब यांनी माय महानगरशी बातचीत केली. माझ्या आईच्या नावावर कसे काय मतदान झाले? याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नसल्याचे ते म्हणाले.

 

First Published on: April 29, 2019 3:37 PM
Exit mobile version