पोलिसावर हल्ला करणार्‍या आरोपीला अटक

पोलिसावर हल्ला करणार्‍या आरोपीला अटक

बोगस दस्तावेजच्या आधारे फसवणुकीप्रकरणी आरोपीस अटक

दारुच्या नशेत टेम्पो चालवून ड्युटीवर असलेल्या एका वाहतूक पोलीस शिपायावर पेव्हर ब्लॉकने हल्ला करणार्‍या टेम्पोचालकास मंगळवारी पवई पोलिसांनी अटक केली. बबन साहेबराव माने असे या ४९ वर्षीय टेम्पोचालकाचे नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?

भैरवनाथ सखाराम जाधव हे वाहतूक पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री ते पवईतील एनटीपीसी जंक्शन परिसरात गस्तीवर तैनात होते, यावेळी तिथे यु टर्न नसताना एका टेम्पोचालकाने पोलीस नसल्याचे पाहून टेम्पो यु टर्न घेतला होता. हा प्रकार भैरवनाथ जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी टेम्पोला थांबण्याचा इशारा केला. चालक बबन माने याच्याकडे लायसन्सची मागणी केली असता, तो दारुच्या नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करताना त्याने त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बाजूला झाल्याने त्यांना दुखापत झाली नाही. त्यानंतर त्याने भैरवनाथ यांच्या दिशेने पेव्हर ब्लॉक फेंकून मारला होता. या घटनेनंतर तिथे असलेल्या पोलिसांनी बबन माने याला ताब्यात घेऊन पवई पोलिसांच्या स्वाधीन केले.

एक दिवसांची पोलीस कोठडी

आरोपी टेम्पोचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी बबन माने याला पोलिसांनी अटक केली. बुधवारी दुपारी त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on: October 17, 2018 9:13 PM
Exit mobile version