मुंबईतील ‘तळीराम’ वाहनचालकांवर आज धडक कारवाई!

मुंबईतील ‘तळीराम’ वाहनचालकांवर आज धडक कारवाई!

तळीराम वाहन चालकांवर मुंबई पोलिसांचा चाप

होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर आज मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्‍या ‘तळीरामांविरुद्ध’ मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी आज धडक कारवाई केली. या कारवाईत ९ हजार १९१ जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हमध्ये ४६१ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. होळी आणि धूलीवंदननिमित्त शहरात मद्यप्राशन करुन तसेच वाहतूक नियमांचे उल्लघंन करुन वाहन चालविण्याच्या घटना सर्रास घडतात. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरुद्धा मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी रात्री बारानंतर विशेष मोहीम हाती घेतली होती. बुधवारी रात्री बारा ते गुरुवारी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ९ हजार १९१ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या ४६१, रॅश ड्रायव्हिंग १६२, ओव्हर स्पिडींगच्या ३४५, ट्रिपल सीटच्या ६८०, विना हेल्मेटच्या ४ हजार ५९५ आणि इतर नियम मोडणाऱ्या २ हजार ९४८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

यंदाच्या वर्षी संख्या घटली

या सर्वांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून काहींना नोटीस देऊन लोकल कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ९४ पोलीस ठाण्यातील पोलिसांसह, वाहतूक पोलिसांकडून ‘तळीराम’ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. ३८५ तळीराम वाहन चालक आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अशा सुमारे ७ हजार १३१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, २०१८ च्या तुलनेत यंदा कऱण्यात आलेल्या कारवाईचा आकडा कमी झाला आहे. गेल्यावर्षी ७४३ तळीरामावर करावी करण्यात आली होती यंदा हा आकडा निम्म्यावर आला आहे. मुंबईत कुठेही मद्यप्राशन करून अपघात झाल्याची घटना घडलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First Published on: March 21, 2019 9:45 PM
Exit mobile version