मुंबई पोलिसांनी गोंधळामुळे लाल, पिवळे, हिरवे स्टिकर केले रद्द

मुंबई पोलिसांनी गोंधळामुळे लाल, पिवळे, हिरवे स्टिकर केले रद्द

मुंबई पोलिसांनी गोंधळामुळे लाल, पिवळे, हिरवे स्टिकर केले रद्द

मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी आणि प्रवासासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असतानाही मुंबईच्या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी न झाल्याने मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतील आणि खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित केले होते. मात्र या कलर कोडमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला असून कलर कोडचे आदेश आठवड्याभरातच रद्द करण्यात आला आहे.अत्यावश्यक सेवेतील वाहनांवरील लाल, पिवळा, हिरवा रंग कलर कोडचा निर्णय रद्द करत असल्याची माहिती पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंवरुन दिली आहे. तसेच यासंबंधीचे परिपत्रकरही जाहीर केले आहे.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी पिवळा कलर कोड, मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांसाठी लाल कलर कोड आणि भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्यांसाठी हिरवा कलर कोड देण्यात आला होता. लॉकडाऊनदरम्यान मुंबईत होणाऱ्या वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर कलर कोड स्टिकर लावण्याच्या निर्णय मुंबई पोलिस आयुक्तांनी घेतला.१७ एप्रिल रोजी हा निर्णय झाला होता.

मुंबई पोलिसांनी गोंधळामुळे लाल, पिवळे, हिरवे स्टिकर केले रद्द

मात्र ही पद्धती लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना पोलिसांसह नागरिकांचा गोंधळ उडत असल्याचे पाहायला मिळत होते. तसेच अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेत काम करत नसतानाही पिवळ्या, हिरव्या, लाल रंगाचे स्टिकर वाहनांना चिटकवून प्रवास करत होते. त्यामुळे तपासादरम्यान पोलिसांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. कलर कोडचे आदेश आठवड्याभरातच रद्द करण्यात आला आहे.


 

First Published on: April 24, 2021 8:43 AM
Exit mobile version