मुंबई पोलीस कठीण काळातून जातायत – पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

मुंबई पोलीस कठीण काळातून जातायत – पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

मुंबई आयुक्त परमबीर सिंह यांच्या उचलबांगडीनंतर हेमंत नगराळे यांना मुंबईच्या आयुक्तपदी हेमंत नगराळे यांना नियुक्त करण्यात आले आहे. आताच मुंबई आयुक्त पदभार स्विकारला आहे. सध्या मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात आहे. ही समस्या आपल्या सर्वांच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नेमनूकीच्या आदेशाप्रमाणे हा कार्यभार स्विकारला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जी मुंबई पोलीसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांना चांगले करण्याचा आणि मुंबईतील अधिकारी आणि कर्मचार्यांचा या कार्यात सहभाग लागणार आहे. सर्वांचा सहभाग लाभेल अशी माझी अपेक्षा आहे.

महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसांचे नाव चांगले करण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे. सक्षम पोलीस दल म्हणून आम्ही कार्य करु असे आश्वासन नवे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे. मागील काहिदिवसांपासून जे काही आपण बघत आहोत. ज्या प्रकारे अधिकाऱ्यांचे सहभाग आहे हे योग्य नाही. त्याचा रितसर तपास एनआयए आणि एटीएसकडून होत आहे आणि हा तपास योग्य पद्धतीने करण्यात येईल याची खात्री असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे.

परमबीर सिंह यांची उचलबांगडी 

मुंबईचे नवे पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपादावरुन उचलबांगडी करुन त्यांना गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांच्याकडे सध्या राज्याच्या पदाची प्रभारी जाबाबदारी दिली होती. मनसुख हिरेन आणि अंबानी स्फोटक प्रकरणातील सचिन वाझेंच्या अटकेनंतरची सर्वात मोठी घटना म्हणजे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उलचबांगडी केल्याची आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करत

First Published on: March 17, 2021 7:35 PM
Exit mobile version