मुंबईत रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बांधकाम बंद

मुंबईत रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बांधकाम बंद

मुंबईत वाढलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईमधील बांधकाम रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्याचा आदेश दिला आहे. संजय पांडे यांनी बांधकाम, व्यावसायिक यांच्याशी बैठक घेतल्यानंतर हे आदेश दिले आहेत. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक आणि कामगारांना रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान बांधकाम करण्यास बंदी असणार आहे. याचसोबत बांधकाम स्थळी आवाज रोखणारे अडथळे बसवा. आवाजाची पातळी डेसिबल मयदपेक्षा जास्त नको. रक्षक मुख्य रस्त्यांवरच न ठेवता केवळ बांधकामाच्या ठिकाणी तैनात करावा. आवाजाची पातळी फक्त 65 डेसिबलच्या खाली असावी, अशा सूचनाही पोलीस आयुक्तांनी बांधकाम व्यावसायिकांना केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी येत होत्या. बांधकामाच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी व्यथा फेसबुक लाईव्हमध्ये काही नागरिकांनी मांडली होती. याची दखल घेत पांडे यांनी हा निर्णय घेतला आहे.

First Published on: March 12, 2022 6:00 AM
Exit mobile version