Drugs : मुंबईत ३ कोटी १८ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Drugs : मुंबईत ३ कोटी १८ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबईत ३ कोटी १८ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करत ३ नायजेरियन नगारिकांना अटक केली आहे. बांद्रा पथकाने ३ नायजरेयिन नागरिकांना अटक केल्यानंतर आतापर्यंत एकूण ३ कोटी १८ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. यामध्ये कोकेन, एमडी, एमडीएमएसह विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की, नववर्षाच्या निमित्ताने काही आंतरराष्ट्रीय नागरिक मुंबईत ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार आहेत. यासाठी मुंबईतील वाशी नाक्यावर बंदोबस्त करण्यात आला होता. या नागरिकांना अटक करत ३ कोटी १८ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान यामध्ये ३ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे २२५ ग्राम कोकेन, १हजार ५०० ग्राम एमडी, २३५ ग्राम एमडीएमए ड्रग्ज सापडले आहे. या ड्रग्जची एकूण किंमत बाजारात ३ कोटी १८ लाख रुपये आहे. एनडीपीसी कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई सुरु केली आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस अलर्ट झाले आहेत. मुंबईतील पार्ट्या आणि ड्रग्ज तस्करांवर पोलिसांची नजर आहे. तसेच कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबईतही ३ नागरिकांना अटक कऱण्यात आली आहे. त्यांच्याकडे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्ज आढळले आहे. तसेच या आरोपींना पोलिसांनी ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा : हरयाणामध्ये डोंगर कोसळून भीषण दुर्घटना! एका व्यक्तीचा मृत्यू, तर १० वाहनं गाडली…

First Published on: January 1, 2022 5:01 PM
Exit mobile version