मध्य रेल्वेवर आजपासून विशेष मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर आजपासून विशेष मेगाब्लॉक

मेगा ब्लॉक अपडेट्स (प्रातिनिधिक फोटो)

मध्य रेल्वेतर्फे ठाणे आणि दिवा स्थानका दरम्यान पाच आणि सहाव्या मार्गिकांसाठी आजपासून विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक सायंकाळपासून सुरु होणार असून २७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत घेतला जाणार आहे. त्यामुळे या दरम्यान मध्य रेल्वेवरील काही फेऱ्या देखील रद्द केल्या जाणार आहे. कल्याण-डोंबिवली येथे जुन्या वीज वाहिन्यांचे जाळे काढण्यासाठी रात्री काम केले जाणार असल्याने रात्री २ ते ३ दरम्यान मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

हे आहे लोकलचे बदलेले वेळापत्रक

सकाळी ५.५७ ची डोंबिवली – सीएसएमटी लोकल २८ ते ६ ऑक्टोबर

सायंकाळी ५.१५ ची ठाणे ते दादर लोकल २७ सप्टेंबर ते ऑक्टोबर

सायंकाळी ५.५८ ची ठाणे ते डोंबिवली लोकल २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर

रात्री ११.१२ ची सीएसएमटी ते ठाणे लोकल २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर

मेगाब्लॉक दरम्यान रद्द होणाऱ्या गाड्या

सकाळी ७.२९ ची डोंबिवली लोकल २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत ठाण्याहून सकाळी ७.५२ वाजता सुटणार आहे.

सायंकाळी ५.५३ ची सीएसएमटी लोकल २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यापर्यंत धावेल.

तर सायंकाळी ६.२२ ची सीएसएमटी लोकल २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यापर्यंत धावेल.

First Published on: September 27, 2018 11:47 AM
Exit mobile version