Mumbai Rain : मुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert

Mumbai Rain : मुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert

Mumbai Rain : मुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert

मुंबईत गेल्या ८ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह कोकणात ९ जून ते १२ जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल होता. मुंबईतील पाऊस शुक्रवार पासून काहीसा कमी झाला आहे. मात्र मुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert देण्यात आला असून, १७ जूनपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात  आला आहे. (Mumbai Rain: Yellow Alert of rain till June 17 in Mumbai) रविवारी मुंबईत हलका पाऊस बरसला. हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेकडून ७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर सांताक्रूझ वेधशाळेकडून ०.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. येत्या आठवड्यात मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला असून १७ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रविवारी काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मुंबई महानगर आणि उपनगरात रविवारी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र रविवारी सकाळपासून मुंबईत पावसाचे ढग आले नाहीत. शनिवारी मुंबईत जमा झालेले पावासाचे ढग दक्षिणकडे वळले. त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर कमी झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आठवड्यात शहर व उपनगरामधील एकाकी जागी जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.


हेही वाचा – मुंबईकरांची पाण्याची चिंता दीड महिना तरी मिटली

 

First Published on: June 14, 2021 9:20 AM
Exit mobile version