Shahrukh Khan : आर्यनचा जामीन अर्ज सुनावणी ते शाहरुख खानची भेट २० तासात काय घडले ? वाचा घटनाक्रम

Shahrukh Khan : आर्यनचा जामीन अर्ज सुनावणी ते शाहरुख खानची भेट २० तासात काय घडले ? वाचा घटनाक्रम

Aryan Khan : आर्यनचा जामीन फेटाळल्यापासून ते शाहरुख भेटीपर्यंतचा घटनाक्रम

अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आज आर्थर रोड कारागृहात पोहचला होता. जवळपास तीन आठवड्यानंतर शाहरुखची आर्यनसोबत भेट झाली. आर्यनचा जामीन अर्ज बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे आर्यन खानला तुरुंगातचं राहावे लागणार आहे. अशातच आता आर्यनच्या हायकोर्टात जामीनासाठीच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी पार असल्याचे हायकोर्टाने जाहीर केले. तसेच आर्यनची एनसीबी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आजही त्याला कोर्टासमोर हजर केले जाईल. यानंतर कोर्टाच्या निर्णयानुसार आर्यनचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार की संपणार हे स्पष्ट होईल. एकूणचं २० ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यापासून ते शाहरुख खान भेटदरम्यानच्या २० तासात नेमकं काय घडले ते जाणून घेऊ.. आर्यन खान ३ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे. त्यामुळे त्याच्या जामीनासाठी आता वकीलांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

आर्यन-शाहरुखच्या भेटीचा असा होता घटनाक्रम : – 

२० ऑक्टोबर

१) २० ऑक्टोबरच्या सुनावणीदरम्यानही अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला.

२) यानंतर आर्यन खानच्या वकीलांनी जामीनासाठी हायकोर्टात अपील केली होता.

३) आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला .

२१ ऑक्टोबर

१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधील कैद्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र रुग्णसंख्या कमी होत असल्याने जेलमधील कैद्यांनी कुटुंबियांनी भेटण्याची परवानही पुन्हा देण्यात आली.

२) या पार्श्वभूमीवर शाहरुख खान देखील आज लेक आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहचला

३) गुरुवारी सकाळी ९ वाजता शाहरुख मुलगा आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात पोहचला.

४) आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रं तपासून त्याला टोकन दिलं गेलं त्यानंतर तो तुरुंगात शिरला.

५) शाहरुखने जवळपास पंधरा ते वीस मिनिटं आर्यनशी संवाद साधला.

६) त्यानंतर ९. ५० च्या दरम्यान तो तुरुंगातून बाहेर आला.

६) यावेळी शाहरुख खानसोबत सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र त्यांना जेलच्या बाहेरच थांबवण्यात आलं.

७) ज्या खोलीत शाहरुख आणि आर्यनची भेट झाली तिथे इतर कैदी किंवा अन्य कोणी उपस्थित नव्हते. फक्त चार पोलीस कर्मचारी होते. दोन आर्यनच्या बाजूला दोन शाहरुखच्या बाजूला.

८) दोघेही कमालीचे भावूक झाले होते.

९) शाहरुख येणार असल्याची कोणालाही माहिती नव्हती, मात्र अचानक सकाळी ९ च्या दरम्यान शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहचला.

१०) यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी किंवा मुलगी सुहाना देखील नव्हती, फक्त सुरक्षा रक्षकचंसोबत होते.

११) नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी असलेल्य़ा गेटने शाहरुख पोलिसांसह आर्यनला भेटण्यासाठी आत गेला. शाहरुख जेल प्रशासनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तुरुंगात पोहचला होता.

१२) मात्र या बाप-लेकामध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसंच शाहरुखनेही भेटीनंतर माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

२१ ऑक्टोबर शाहरुखच्या भेटीनंतरचा घटनाक्रम 

१) आर्यन खानच्या वकीलांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी आर्यन खानच्या वकिलांनी निकालाची प्रत मिळताच न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यापुढे जामीन अर्ज सादर केला आणि अर्जावर गुरूवारी म्हणजे आज तातडीची सुनावणी घेण्याचा विनंती अर्जही सोबत दाखल केला.

२) या अर्जावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आर्यन खानच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी पार पडणार असे जाहीर केले.

गौरी खानने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून साधला संवाद

यापूर्वी गौरी खान देखील आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहचली होती मात्र तुरुंग प्रशासनाने नियमानुसार या भेटीस परवानगी दिली नाही. त्यामुळे गौरी खान आर्यनला खाण्यासाठी बर्गर देऊन निघून गेली. यानंतर तुरुंग प्रशासनाने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून गौरी खान हिला आर्यनसोबत बोलण्याची परवानगी दिली होती. तसेच ११ ऑक्टोबरला आर्यनला तुरुंगात स्व:खर्चासाठी शाहरुखची मॅनेजर हीने ४५०० हजार रुपयांचे मनी ऑर्डर पाठवले होते. शाहरुख खानने मनीऑर्डरद्वारे पाठवलेल्या ४५०० रुपयांमधून आर्यन जेल कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ खात असल्याचं सांगितलं गेलं.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

आर्यन खानच्या जामीनावर मुंबई सत्र न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. सत्र न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, ड्रग्ज प्रकरणातील कटात आर्यन खान सहभागी होता. मात्र न्यायालयाच्या या निर्णयावर आता हाय़कोर्टात सुनावणी होईल. मात्र एनसीबीला देखील या प्रकरणात भक्कमपणे बाजू मांडावी लागेल, की खरोखरंच आर्यन खान त्या कटात सहभागी होता का? किती वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे? जुनी गोष्ट असेल आणि व्हॉटसअप चॅटची देखील सखोल चौकशी करावी लागेल. एखाद्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळला तर त्या व्यक्तीचा त्यात सहभाग आहे की नाही याविषयी एनसीबीला अभ्यास करावा लागेल. आर्यन हा तरुण मुलगा आहे. त्यामुळे तो खरंच याप्रकरणात सहभागी होती का? त्याच्याकडे ड्रग्ज होते का? अशा सर्व गोष्टींचा विचार करुन हायकोर्ट निर्णय घेईल.


Aryan Khan : आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहात

First Published on: October 21, 2021 11:10 AM
Exit mobile version