मुंबई उपनगरातून ५ उमेदवारांची माघार

मुंबई उपनगरातून ५ उमेदवारांची माघार

48 मुलांच्या बापाने केले मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यातील आज पाच उमेदवारी अर्ज मागे मागे घेतला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे, मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघात एकूण ८६ उमेदवार होते त्यापैकी ५ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे अधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. सचिन कुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उत्तर मतदार संघातून १८, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून २१, मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदार संघातून २७, मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून २० उमेदवार असणार आहे.

२ एप्रिल ते ९ एप्रिल रोजी पत्रांची छाननी

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने येणाऱ्या २९ एप्रिल रोजी हे मतदान पार पडणार आहे. २ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. त्यात १३ उमेदवारांची पत्रे अवैध तर ९१ उमेदवारांची पत्रे वैध ठरली.

अर्ज माघारी घेणारे उमेदवार

मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघ – राकेश विश्वनाथ अरोरा
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ – ज्योती सुरेश शेट्टी
मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदार संघ – राजेंद्र वामन वाघमारे
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघ – राकेश अरोरा
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघ – मुइनुद्दीन यार मोहम्मद खान

First Published on: April 12, 2019 6:59 PM
Exit mobile version