वांद्रेमधील माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ल्याची धमकी; लष्कर-ए-तोय्यबाकडून पोलिसांना ईमेल

वांद्रेमधील माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ल्याची धमकी; लष्कर-ए-तोय्यबाकडून पोलिसांना ईमेल

नववर्षाच्या स्वागतात मुंबई व्यस्त असताना आता वांद्र्यातील प्रसिद्ध माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेने चर्चमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांना एका terrorist@gmail.com या मेल आयडीवरुन हा धमकीचा मेल आला आहे. या घटनेची मुंबई पोलीस गांभीर्याने दखल घेतली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या धमकीच्या पार्श्वभूमीवर तपास सुरु केला आहे. या धमकीनंतर आता चर्च परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढण्यात आली आहे. राज्यभरात ख्रिसमस सणाचा उत्साह पाहायला मिळतोय, यात माऊंट मेरी चर्च हे ख्रिश्चन बांधवांचे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण आहे. यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची गर्दी असते. अशावेळी धमकीचा मेल आल्याने आता त्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

माऊंट मेरी चर्चचे अधिकृत छायाचित्रकार पीटर डॉमनिक डिसोझा यांच्या ई-मेल आयडीवर हा मेल आला आहे. बुधवारी सायंकाळी‘टेररिस्ट’या युजर आयडीवरून त्यांना लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेकडून हल्ला होणार असल्याचा मेल आला होता.

चर्चवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या धमकीच्या मेलनंतर आणखी एक मेल पोलिसांना मिळाला आहे. यानंरच्या दुसऱ्या मेलमध्ये म्हटले आहे की, ज्या ई-मेलवरून चर्चवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली, तो मेल करणाऱ्या मुलाची मी आई आहे. चर्चवर हल्ला करणार असल्याचा मेल माझ्या मुलाने पाठवला होता. आपल्या मुलाची मानसिक परिस्थिती ठीक नसल्याचे यातून म्हटले आहे. मात्र याप्रकरणाचा आता मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.


२०२४ मध्ये राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचं मोठं वक्तव्य

First Published on: December 30, 2022 9:21 PM
Exit mobile version