मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर ७ लाखांचा खर्च

मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर ७ लाखांचा खर्च

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत मुंबई विद्यापीठाने ७.४४ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे. यात सर्वाधिक ५.६५ लाख रुपयांचा खर्च हा प्रवास आणि जाहिरातींवर करण्यात आला आहे.

९ महिन्यानंतर मुंबई विद्यापीठाने दिले उत्तर

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे २७ मार्च २०१८ रोजी मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत सर्वप्रकारच्या झालेल्या निवडणूक खर्चाची माहिती मागितली होती. त्यानुसार अनिल गलगली यांच्या अर्जाला तब्बल ९ महिन्यानंतर मुंबई विद्यापीठाने उत्तर देत माहिती दिली आहे.

असा करण्यात आला खर्च

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत ७ लाख ४४ हजार ४९९ रुपये खर्च झाले असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या वित्त आणि लेखा विभागाचे उप कुलसचिव राजेंद्र आंबवडे यांनी अनिल गलगली यांना दिली. या खर्चात सर्वाधिक खर्च हा प्रवास यावर झाला असल्याची माहिती समोर आले आहे. प्रवास खर्चाला एकूण रक्कम ३ लाख २२ हजार ८९ रुपये लागले आहेत. तर जाहिरातीकरता २ लाख ४३ हजार २३२ रुपये खर्च आला आहे. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअरसाठी देखील ६८ हजार ८१० रुपये तर टोनर रीफिल्लिंगसाठी १६ हजार ६३८ रुपये खर्च आला आहे. तसेच डेकोरेशनसाठी २० हजार ५०० रुपये आणि ट्रेनिंग वोट काऊटिंगसाठी ३ हजार ३३० रुपये इतका खर्च आला असून ६९ हजार ९०० रुपये हे रुग्णालयावर खर्च करण्यात आले आहेत.

First Published on: December 25, 2018 9:37 PM
Exit mobile version