Video : हिजाबमुळे महिलेला नाकारला रेस्टॉरंट प्रवेश, वरळीतील घटना

Video : हिजाबमुळे महिलेला नाकारला रेस्टॉरंट प्रवेश, वरळीतील घटना

हिजाबमुळे महिलेला नाकारला रेस्टॉरंट प्रवेश, वरळीतील घटना

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिडा आणि हिजाब परिधान केल्यामुळे महिलेला चक्क रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याचा लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडिओ मुंबईतल्या वरळी भागातील आहे. इन्स्ट्राग्रामवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वरळीच्या अट्रिया मॉलमधील रेस्टो बार टॅपमध्ये महिलेने प्रवेश करताच तिला हिजाब काढण्यास सांगण्यात आले. रेस्टॉरंटमधील कर्मचारी महिलेच्या मित्रांना सांगताना दिसतायत की, तुम्ही या महिलेला हिजाब काढण्यास सांगा.

व्हायरल होणारा २ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटमध्ये काम करणारा कर्मचारी सांगतोय की, रेस्टॉरंटमध्ये साड्या नेसून य़ेणाऱ्या महिलांनाही आम्ही परवानगी देत नाही. तसेच आम्ही रेस्टॉरंटमध्ये भारतीय पोशाखांना परवानगी देत नाही. असेही तो सांगतोय. या व्हायरल व्हिडिओवर आता संबंधित रेस्टॉरंटच्या या प्रवेश धोरणावर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या व्हिडिओ शेअर सकिनामाईमूनने लिहिले की, मला आश्चर्य वाटतेय की असे मूर्ख निर्बंध अजूनही भारतासारख्या धर्मनिरपेक्ष समाजात अस्तित्वात आहेत. आज माझ्या मैत्रिणीला एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला कारण तिने रिडा, एक प्रकारचा हिजाब घातला होता. तो रेस्टॉरंटच्या प्रवेश धोरणानुसार, अयोग्य असल्याचे सांगत काढून टाकण्यास सांगण्यात आलं. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. अशी संताप युजर्स व्यक्त करत आहेत.

यापूर्वीही देखील दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये भारतीय पोशाख असलेली साडी परिधान केल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आल्याची लाजिरवाणी घटना समोर आली होती. तुम्ही साडी घातली आहे. त्यामुळे हे ‘स्मार्ट विअर’ नसल्यामुळे तुम्हाला आम्ही आतमध्ये यायची परवाणगी देऊ शकत नाही. असे त्या रेस्टॉरंट टीमकडून सांगण्यात आले.

त्यामुळे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात प्रत्येकाला आपली संस्कृती, भाषा, पोशाख परिधान करण्य़ाचे स्वातंत्र्य असताना अशा रेस्टॉरंटमध्ये पोशाखावरून प्रवेश नाकारला जात असल्याने नेटीजन्स या रेस्टॉरंटविरोधात रोष व्यक्त करत आहेत.


राज ठाकरे दिवाळीनंतर करणार अयोध्या दौरा


First Published on: October 18, 2021 2:35 PM
Exit mobile version