पालिकेचे ‘वॉर्ड वॉर रूम’ सज्ज! कोरोना बाधितांच्या मदतीसाठी इथे करा संपर्क

पालिकेचे ‘वॉर्ड वॉर रूम’ सज्ज!  कोरोना बाधितांच्या मदतीसाठी इथे करा संपर्क

कोविड बाधित रुग्णांना आवश्यक व तातडीने रुग्णशय्या उपलब्ध होण्यासह ‘कोविड-१९’ संबंधी विविध अडचणींबाबत नागरिकांना थेटपणे मार्गदर्शन मिळावे; या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने विकेंद्रित पद्धतीने रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed Management) जून २०२० पासून अंमलात आणली असून ती आजतागायत अव्याहतपणे कार्यरत आहे. महानगरपालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर ‘वॉर्ड वॉर रूम्स’ म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. कोविड बाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक ह्यांना ‘कोविड-१९’ बाबत मदत व मार्गदर्शन हवे असेल, तर वॉर्ड वॉर रूमकडे संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये बाधित रुग्णांना आवश्‍यकतेनुसार रुग्णालयांमध्ये रुग्ण शय्या मिळवून देणे तसेच गृहविलगीकरणात बाधित असलेल्या रुग्णांना योग्य स्वरूपाचे समुपदेशन करण्यासाठी आता ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी ‘वॉर्ड वॉर रूम’ महत्वाची कामगिरी बजावत आहेत. जून २०२० पासून विकेंद्रित पद्धतीने २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावरून रुग्णांसाठी ही कार्यप्रणाली नियमितपणे सुरु आहे. यातून कोविड बाधित रुग्णांना विभाग स्तरावरुनच अधिक जलद, सुलभ व प्रभावीपणे आरोग्य सेवा देण्यास मदत होत आहे.

या ‘वॉर्ड वॉर रूम’ अर्थात विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे

वर उल्लेखित ‘लँडलाईन’ दूरध्वनी क्रमांकांवर भ्रमणध्वनीवरून संपर्क साधावयाचा झाल्यास क्रमांक पूर्वी ‘०२२’ हे आकडे जोडणे आवश्यक ‌आहे)

प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये दिल्या “दिवसाचे चोवीस तास व आठवड्याचे सातही दिवस” अर्थात ‘२४x७’ तत्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी कार्यरत आहेत. वॉर्ड वॉर रुममुळे कोरोना बाधितांना प्रभावी सेवा देण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. अधिकाधिक कोविड रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा आणि समुपदेशन दिले जात आहे. गरजू कोरोना बाधितांना तात्काळ योग्य रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुलभ व जलद गतीने होत आहे. विभाग कार्यालयांना कोरोना रुग्णसेवेसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापनही विभागीय कक्षाद्वारे होत असल्याने रुग्णवाहिकांचा प्रतिसाद कालावधी ‘अधिक लवकर व जलद’ झाला आहे.

यासोबत गृह विलगीकरणात असलेल्या कोविड बाधितांशी सातत्याने संपर्क साधून त्यांची अद्ययावत माहिती घेणे, नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करणे, स्थानिक पातळीवर कामकाजात योग्य समन्वय साधणे ह्यातून वॉर्ड वॉर रूम यंत्रणेने मध्यवर्ती यंत्रणेवरील ताण हलका तर केलाच पण मुख्य म्हणजे कोविड बाधितांच्या समस्यांचे निराकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

कोविड बाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक ह्यांनी योग्य त्या मदतीसाठी आपापल्या विभाग स्तरावरील ‘वॉर्ड वॉर रूम’ कडे संपर्क साधावा, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत रविवारी १९,४७४ कोरोनाबाधितांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

First Published on: January 9, 2022 10:04 PM
Exit mobile version