मुंबईत दोन दिवस कूल कूल

मुंबईत दोन दिवस कूल कूल

मुंबईकरांना पुन्हा दोन दिवस थंडीचा अनुभव घेता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी मुंबईमध्ये पुन्हा एकदा किमान तापमान खाली उतरले. तापमानातील घट दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

शनिवारी सकाळी सांताक्रूझ येथे किमान तापमान १६.९ अंश होते. तर कुलाबा येथे १९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी सांताक्रूझ येथे १९.२ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे २१ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. शनिवारी मुंबईत सांताक्रूझ येथे सुमारे दोन अंशांहून अधिक तापमानात घसरण झाली.

First Published on: February 7, 2021 11:47 PM
Exit mobile version