मुंबईच्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’

मुंबईच्या स्मृती पांचाळ बनल्या ‘मिसेस युनिव्हर्सल’

स्मृती पांचाळ बनल्या मिसेस युनिव्हर्सल

दक्षिण अमेरिकेतील बोलव्हीया येथे झालेल्या स्पर्धेत मुंबईच्या स्मृती पांचाळ यांनी मिसेस युनिव्हर्सल २०१८ तसेच मिसेस एलिगन्स २०१८ हे दोन मानाचे किताब पटकावले. स्मृती पांचाळ यांना मिळालेल्या या सन्मानामुळे १७ नोव्हेंबर २०१८ ची संध्याकाळ भारतीयांसाठी अभिमानाची ठरली आहे. याआधी स्मृती पांचाळ यांनी मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल वर्ल्ड, मिसेस एशिया इंटरनॅशन, मिसेस इंडिया अर्थ, मिसेस  भारत आयकॉन यांसारखे अनेक मानाचे किताब मिळविले आहे. बोलव्हीया येथे झालेल्या स्पर्धेत ४० स्पर्धकांना मागे टाकत, स्मृती पांचाळ यांनी स्वतःची वेगळी ओळख सिध्द केली. यावेळी त्यांनी उत्कृष्ट रॅम्पवॉक करत मोठ्या आत्मविश्वासाने स्पर्धेत टिकाव धरला. यावेळी त्यांना त्यांच्या गोऱ्या रंगाबद्दलचे रहस्य विचारले असता घरगुती जेवण, प्राणायम आणि योगा हेच त्यामागचे रहस्य असल्याचे त्यांनी सांगितले. व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्यामध्ये तुम्ही कसा समतोल राखता याविषयी विचारले असता, माझा नवरा आणि मुलगा हे दोघेही नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने त्यातूनच मला प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत स्त्रियांसाठी देखील स्मृती पांचाळ यांचे महत्त्वाचे योगदान ठरले आहे. अशा स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे करून प्रोत्साहन देणे तसेच महिलांना स्वावलंबनाचे धडेही दिले जात आहेत. स्वावलंबंन नावाच्या त्यांच्या एनजीओ अंतर्गत महिलांना स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील त्यांनी राजकीय आर्थिक विषयांवर हात घालत शेतकरी, कामगार तसेच महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.


पाहा: ‘दीपवीर’च्या लग्नाच्या फोटोंवरही Funny Memes

First Published on: November 19, 2018 4:43 PM
Exit mobile version