मुंबईकरांनो लक्ष द्या; लालबाग फ्लायओव्हर ‘या’ वेळेत तीन महिन्यांसाठी असणार बंद

मुंबईकरांनो लक्ष द्या; लालबाग फ्लायओव्हर ‘या’ वेळेत तीन महिन्यांसाठी असणार बंद

लालबाग फ्लायओव्हर 'या' वेळेत तीन महिन्यांसाठी असणार बंद

मुंबईकरांसाठी खुप महत्वाची बातमी आहे. लालबाग फ्लायओव्हर काही महिने बंद काही विशिष्ट वेळेसाठी बंद असणार आहे. मुंबई महानगरपालिकेने लालबाग फ्लायओव्हरचे दुरुस्तीचं आणि बेअरिंगचं काम हाती घेतलं आहे. यामुळे लालबाग फ्लायओव्हर पुढील तीन महिन्यांसाठी बंद असणार आहे. बुधवारपासून हा फ्लायओव्हर बंद असणार आहे.

पालिकेने लालबाग फ्लायओव्हरवरील दुरुस्ती आणि बेअरिंगचं काम सुरू केलं असून बुधवारपासून पुढील तीन महिने रात्री ११ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद असणार आहे. जर या फ्लायओव्हर वरुन वाहतुक केली तर त्याचा कामावर परिणाम होईल. त्यामुळे दक्षिण मुंबईहून येणारी वाहतुक परळ पूल किंवा परळ टीटी जंक्शनमार्गे जाऊ शकतात किंवा पुलाच्या खालून १५ जूनपर्यंत वाहने चालवू शकतात, असं पालिकेनं म्हटलं आहे.

“राणी बागजवळील भायखळा बाजार ते उत्तर दिशेकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पुढील तीन महिन्यासाठी बंद ठेवण्यात येईल,” असं पोलिस उपायुक्त (दक्षिण रहदारी) योगेश कुमार यांनी सांगितलं. या कालावधीत सुलभ वाहनांच्या मार्गदर्शनासाठी वाहतूक पोलिस तैनात केले जातील, असं देखील ते म्हणाले.

 

First Published on: March 24, 2021 8:57 AM
Exit mobile version