चायनिज अन्नपदार्थ बेततायत जीवावर; अजिनोमोटोमुळे मुंबईकरांना दम्याचा त्रास

चायनिज अन्नपदार्थ बेततायत जीवावर; अजिनोमोटोमुळे मुंबईकरांना दम्याचा त्रास

चायनिज पदार्थ

रस्त्यावरील पदार्थ खायला प्रत्येकालाच आवडतं. त्यातही चायनिज पदार्थ पाहिले तरी जिभेला पाणी सुटतं. पण, चायनिज बनवताना वापरला जाणारा अजिनोमोटो हा पदार्थ लोकांच्या जीवावर उठत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी अजिनोमोटोपासून चायनिज बनवलं जातं. हे पदार्थ खाल्यामुळे शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये श्वसन विकार बळावून दम्याचा आजार होत आहे.


हेही वाचा – भारतातील चायनिज बोगस; जाणून घ्या अजिनोमोटोचे दुष्परिणाम


चायनीज स्टॉलवर कारवाई

२०१५ ते २०१७ या सालादरम्यान पालिकेच्या चार प्रमुख हॉस्पिटल्समध्ये दम्याच्या एकूण १८ हजार ५३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, १६ उपनगरीय हॉस्पिटलमध्ये दम्याच्या २१ हजार ५४४ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. तसंच, अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आलेल्या चायनीज अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या तपासणी मोहिमेत एकूण ५६ तपासण्या करण्यात आल्या असून उल्लंघन आढळलेल्या २६ प्रकरणांमध्ये १ लाख ८४ हजार ५०० इतका दंड वसूल करण्यात आला, असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना जनरल फिजीशियन डॉ. सागर कजबजे यांनी सांगितलं की, ” खरं तर अजिनोमोटो आणि श्वसन विकार यांचा परस्पर संबंध तेवढा नाही. पण, ज्यांना आधीपासून श्वसनाचा आजार आहे त्यांचा आजार नक्कीच बळावू शकतो. जे सतत चायनीज पदार्थ खातात त्यांच्या श्वसन‌ विकारांमध्ये नक्कीच भर पडू‌ शकते. त्यामुळे असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. “

 

‘तसंच ज्यांना अॅलर्जीचा त्रास असतो किंवा फुफ्पुसाचे आजार असतील त्यांना अजिनोमोटोच्या अतिसेवनाने नक्कीच त्रास होऊ शकतो.’ असं जनरल फिजीशियन डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितलं.

First Published on: June 19, 2019 9:35 PM
Exit mobile version