मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १८ टक्के जलसाठा शिल्लक

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १८ टक्के जलसाठा शिल्लक

मुंबईत पावसाचे जोरदार आगमन झाले. पहिलया आठवड्याच पावसाचे जोरदार बॅटींग केली मात्र त्यानंतर मुंबईत पावसाने विश्रांती घेतली. संपूर्ण जून महिन्यात मुंबईत पाऊस झालाच नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुन्हा थोडी सुरुवात केलीय. यंदा कमी पावसामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील जलसाठ्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ आता १८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

मुंबईला दररोज ३ हजार ८०० दशलक्ष पाणी पुरवठा केला जातो. संपूर्ण वर्षात मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी १ ऑक्टोबरला १४ लाख ४७ दशलक्ष पाणी पुरवठा उपलब्ध असणे गरजेचे असते. गेल्या वर्षी याच काळात मुंबईत १७.५० टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि तलाव भरुन वाहत होते. तर २०१९ मध्ये याच काळात २५ टक्के जलसाठा उपलब्ध होता.

८ जुलै २०२१ रोजी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्याची आकडेवारी

मोडक सागर तलाव 

कमाल १६३.१५
किमान – १४३.२६
उपायुक्त साठा – ४१२९३ दशलक्ष
सध्या उपयुक्त साठा – १५१.१५

तानसा तलाव 

कमाल १२८.६३
किमान – ११८.८७
उपायुक्त साठा – ४४६१९ दशलक्ष
सध्या उपयुक्त साठा – १२२.५५

विहार तलाव 

कमाल ८०.१२
किमान -७३.९२
उपायुक्त साठा – १६८१७ दशलक्ष
सध्या उपयुक्त साठा – ७७.९९

तुळशी तलाव 

कमाल – १३९.१७
किमान – १३१.०७
उपायुक्त साठा – ५९०१ दशलक्ष
सध्या उपयुक्त साठा – १३७.५०

अप्पर वैतरणा तलाव 

कमाल – ६०३.५१
किमान – ५९७.०२
उपायुक्त साठा – ००० दशलक्ष
सध्या उपयुक्त साठा – ५९२.६१

भातसा तलाव 

कमाल – १४२.०७
किमान – १०४.९०
उपायुक्त साठा – १३२९०९ दशलक्ष
सध्या उपयुक्त साठा – ११४.५०

मध्य वैतरणा तलाव 

कमाल – २८५.००
किमान – २२०.००
उपायुक्त साठा – २२०९२ दशलक्ष
सध्या उपयुक्त साठा – २४०.८०


हेही वाचा – ‘तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा संबंध काय ते आधी सांगा’; चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल

First Published on: July 9, 2021 11:58 AM
Exit mobile version