मुंबईच्या वाहन खरेदीला ब्रेक 20 टक्क्यांनी खरेदी घटली

मुंबईच्या वाहन खरेदीला ब्रेक 20 टक्क्यांनी खरेदी घटली

वाहन खरेदी घटली

संपूर्ण देशात वाहन उद्योगावर मंदीचे सावट आहे. त्याचे परिणाम मुंबई शहरातही स्पष्टपणे दिसू लागले आहेत. 2018-19 या आर्थिक वर्षात मुंबई शहरातील वाहन खेरदी तब्बल 20 टक्क्यांनी घटली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 14 हजार 432 चारचाकी नव्या वाहनांची आरटीओमध्ये नोंदणी झाली होती. यावर्षी ती संख्या 12 हजार 230 इतकी खाली आली आहे.

मुंबई आणि उपनगरात एप्रिल ते जुलै २०१९ या तीन महिन्यांत 62 हजार 999 वाहनांची विक्री झाल्याची नोंद आरटीओच्या चार विभागीय कार्यालयात करण्यात आली आहे. हीच संख्या एप्रिल ते जुलै २०१८ मध्ये ७८ हजार २२२ एवढी होती. यावरुन वाहनांच्या नोंदणीत २० टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. दुचाकी वाहनांची संख्या देखील कमी झालेली आहे. गेल्या वर्षी ४३ हजार ३९३ दुचाकी वाहनांची नोंदणी झाली होती. ती संख्या आता ४१ हजार २२० वर आलेली आहे. वाहनांच्या नोंदणीतून परिवहन विभागाला आर्थिक उत्पन्न मिळते.

परंतु सध्या वाहनांचे रजिस्ट्रेशन मंदावल्यामुळे त्याचा थेट परिणाम परिवहन विभागाच्या महसुलावर झालेला दिसून येतो. चालू वर्षाच्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात ६९ हजार ७६७ वाहने मुंबईच्या आरटीओमध्ये नोंद झालेली आहेत. जानेवारी ते मार्च २०१८मध्ये हीच संख्या ९० हजार २३४ इतकी होती. आरटीओच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात नोंदणी होणार्‍या वाहनांच्या संख्येत१५ ते १७ टक्क्यांनी घट झाली आहे. सध्याच्या घडीला मुंबईत एकूण ३६ लाख वाहने आहेत.

First Published on: August 13, 2019 5:27 AM
Exit mobile version