महापालिकेने एफडी मोडून दिले बेस्टला पैसे

महापालिकेने एफडी मोडून दिले बेस्टला पैसे

पुन्हा प्लास्टिक बंदी, पण अंमलबजावणीसाठी सक्षम अधिकार्‍याचा शोध

तोट्यात चाललेल्या बेस्टला महापालिकेच्यावतीने आर्थिक मदत करण्यात येत असून बेस्टचे कर्ज फेडण्यासाठी दिलेल्या ११३६ कोटी रुपयांच्या अनुदानाच्या रकमेसाठी महापालिकेला मुदत ठेवी (एफडी) मोडाव्या लागल्या आहेत. बेस्टला ११३६ कोटींपैकी ४७८ कोटींची रक्कम ही मुदतीपूर्वीच मुदत ठेवी मोडून देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने,बेस्टला ६०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्यानंतर ११३६ कोटींची रक्कम कर्ज फेडण्यासाठी दिली आहे. त्यानंतर आता अतिरिक्त ४०० कोटी रुपये बेस्टला देण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मात्र,बेस्टवरील कर्ज फेडण्यासाठी ११३६ कोटी रुपयांच्या अनुदानाची रक्कम ही महापालिकेने चक्क ४७८ कोटींची मुदत ठेवी मोडून दिली आहे. त्यासाठी १९ ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवी मोडण्यात आल्या.

मुंबई महापालिकेच्या एकूण ८० हजार कोटींच्या मुदतठेवी विविध बँकांमध्ये असून महापालिकेच्या निधी खात्यांमध्ये जमा होणारी रक्कम बिनव्याजी पडून राहण्याऐवजी स्टेट बँकांसह इतर बँकांमध्ये ठेवली जाते. या तिन्ही मुदत ठेवी मुदतीपूर्वी मोडल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत केवळ ५८ लाख रुपये जमा आहेत.
कर्जामुळे बेस्टला वार्षिक ९ ते ११ टक्के दराने व्याजदर भरावा लागतो. व्याजदराचा हा बोजा कमी करण्यासाठी बेस्टला कर्ज फेडता यावे म्हणून महापालिकेने ११३६ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेकडे त्या कालावधीत रोख रक्कम नसल्याने या मुदत ठेवी मोडाव्या लागल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बँकेतील मुदतठेवींची रक्कम,कालावधी आणि त्यावरील व्याज
गुंतवणुकीची तारीख ७ ऑगस्ट २०१९ ते ७ नोव्हेंबर २०२० : एकूण रक्कम २५० कोटी रुपये (6.७० टक्के)
गुंतवणुकीची तारीख ८ ऑगस्ट २०१९ ते १४ ऑक्टोर२०२० : एकूण रक्कम ११३ कोटी रुपये (6.७० टक्के)
गुंतवणुकीची तारीख १३ ऑगस्ट २०१९ ते १६ ऑक्टोर२०२० : एकूण रक्कम ११५ कोटी रुपये (6.७० टक्के)

First Published on: September 14, 2019 5:07 AM
Exit mobile version