मुंबईकरांसाठी खुशखबर : रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या घटली, महापालिकेचा दावा

मुंबईकरांसाठी खुशखबर : रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या घटली,  महापालिकेचा दावा

मुंबईत मागील वर्षाच्या तुलनेत 3 हजार खड्डे कमी झाल्याचा दाव करण्यात आला आहे. 1 एप्रिल ते 7 जुलै दरम्यान महानगरपालिकेने 7 हजार 211 खड्डे बुजवले आहेत. खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी आणि रस्ते देखभाल करण्यासाठी महानगरपालिकेने पथक आणि कंत्राटदार नेमला आहे. तसेच विविध उपाययोजना केल्या आहेत. मागील वर्षात याचवेळेत महानगरपालिकेने सुमारे 10 हजार 199 खड्डे बुजवले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत खड्ड्यांची संख्या कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

अशी नोंदवली जाते खड्ड्यांची तक्रार –

रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरित बुजवण्याचे काम महापालिकेतर्फे केले जाते. खड्ड्याबाबत तक्रारी नोंदवण्यासाठी महापारिकेतर्फे संकेतस्थळ, मोबाईल अॅप, समाज मध्यमं, टोल फ्री दूरध्वनी क्रमांक असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. याचा अपयोग खड्डे बुजवण्यासाठी झाला आहे. पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे, ही नेहमीची प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येतात. यंदाही अशा अपाययोजना करण्यात आल्या होत्या.

 महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केली भूमीका –

खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी मुंबई महानगरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत आहेत. मागील 5 वर्षात 608 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मुंबईतील सुमारे 800 किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे झाले आहेत. यापुढे 6 मीटर रुंदीचे रस्तेसुद्धा टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटीकरणाचे जाळे वाढवून खड्डेमुक्त मुंबई हेच धोरण राहणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

First Published on: July 9, 2022 5:55 PM
Exit mobile version