दिवा डम्पिंगच्या प्रस्तावाला महापालिका महासभेत स्थगिती

दिवा डम्पिंगच्या प्रस्तावाला महापालिका महासभेत स्थगिती

'इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या २० शहरात समावेश

दिवा डम्पिंगवर कचरा टाकण्याचे बंद करण्यात आलेले नाही. त्यातच पुन्हा डम्पिंगचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी आणण्यात आला. या प्रस्तावावर दिव्यातील नगरसेवकांनी आक्षेप नोंदवत दिव्यात डम्पिंगच नको असल्याचा सूर काढला, तर डम्पिंगची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट असल्याचा आरोप करीत दिवा डम्पिंग म्हणजे 500 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप सभागृहात राष्ट्रवादी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला. त्यामुळे या प्रस्तावाला महासभेने स्थगिती दिली.

दिव्यातील डम्पिंगच्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी 269 कोटींच्या निधीचा वापर करण्यास पालिका तयार आहे. तसेच दिवा डम्पिंगच्या जागेवर आरक्षण टाकण्याचे काम एकीकडे करण्यात येत आहे. तर दुसरीकडे याठिकाणी गार्डन आणि मैदाने साकारण्याची घोषणा करून दिवावासीयांची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवकाने केला.

याबाबत माहिती देताना प्रशासनाच्या वतीने उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले की, ठामपाची स्वतःची क्षेपणभूमी नाही. त्यामुळेच खाजगी जागेवर कचर्‍याची विल्हेवाट लावली जाते. तर भाईंदर पाडा येथील जागेवर अतिक्रमण झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते नजिब मुल्ला यांनी दिली, तर दिव्यात डम्पिंग नकोच, असा सूर दिवा परिसरातील नगरसेवकांनी काढला.

First Published on: November 22, 2019 2:45 AM
Exit mobile version