कंत्राटदारांच्या कामावर पालिकेचा वॉच

कंत्राटदारांच्या कामावर पालिकेचा वॉच

mahanagarpalika

मुंबई महापालिकेच्यावतीने रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलांची कामे हाती घेण्यात आली आहे. या पुलांच्या कामांसाठी कंत्राटदार निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, आता कंत्राट कामांवर देखरेख ठेवण्यासाठी समन्वयकाची नेमणूक करण्यात येत आहे. महापालिकेच्या प्रकल्पकामांसाठी सल्लागार तसेच प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमण्यात येतात. पण आता त्यात समन्वयकाची आणखी एक भर पडली आहे. विद्याविहार रेल्वे स्थानकावर बांधण्यात येणार्‍या पुलाचे बांधकाम करण्यासाठी समन्वयकाची नियुक्ती केली आहे. विद्याविहार रेल्वे स्थानकावर एलबीएस मार्ग आणि आर.सी.मार्ग यांना जोडणार्‍या उड्डाणपुलांचे बांधकाम करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मेसर्स राईट्स लि. यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. पुलाच्या या बांधकामात रेल्वे हद्दीतील कामाची देखरेख तसेच आवश्यक अभियांत्रिकी सेवा पुरवण्यासाठी या कंपनीची निवड केली आहे.

पालिका मोजणार 2 कोटी 10 लाख

1100 मेट्रीक टन स्टिल गर्डर फेब्रिकेशन कामाचे निरीक्षण यासाठी 90 लाख रुपये तर कामाच्या ठिकाणी देखरेख ठेवण्यासाठी वर्षभरासाठी 1 कोटी 20 लाख रुपये दिले समन्वयकाला दिले जातील. असे एकूण 2 कोटी 10 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. देखरेखीसाठीच महिन्याला दहा लाख रुपये खर्च होणार आहेत. परंतु, या पुलाचे काम 12 महिन्यांत पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे कंत्राट कालावधी वाढवला जाणार आहे. त्यामुळे कंत्राट रक्कमही वाढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राईट्स ही संस्था भारत सरकारचा उपक्रम असल्याने रेल्वेच्या हद्दीतील पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाची देखरेख आणि आवश्यक अभियांत्रिकी सेवा पुरवण्यासाठी या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

– संजय दराडे, प्रमुख अभियंता (पूल) विभाग

First Published on: December 18, 2018 4:55 AM
Exit mobile version