सीएए, एनआरसीविरोधात मुंबईत पुन्हा आंदोलन

सीएए, एनआरसीविरोधात मुंबईत पुन्हा आंदोलन

Flash Back 2020: आंदोलनांना हिणवण्याचे वाईट दिवस!

सीएए, एनआरसी आणि एनपीआर या तिन्ही कायद्याला गेल्या अनेक महिन्यांपासून विरोध केला जातोय. शनिवारीही या कायद्याला मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात विरोध करत आझाद मैदानात आंदोलन केलं. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या कायद्यासाठी घेतलेल्या निर्णयाला विरोध केला जातोय. फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण देशात या कायद्याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. मुंबईच्या नागपाडा परिसरातही या कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. तर, तसेच काहीसे चित्र शनिवारी आझाद मैदानात ही पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने मुस्लिम नागरिक आझाद मैदानात आंदोलन करत ‘संविधान बचाव’चा नारा देत होते. एकूण ६५ संघटना या महामोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी देखील सहभागी झाले होते.

यावेळी महाराष्ट्रात एनपीआर देखील लागू होऊ नये अशी आमची मागणी आहे आणि आम्ही ती राज्य सरकारकडे मांडणार. तसंच, स्वत:च्या पैशाने लोक आंदोलनाला येत आहेत. आपलं घर हिरावलं जातंय याची लोकांना भीती वाटतेय असंही अबू आझमी यांनी स्पष्ट केलं आहे.

दोन ठग लोकांना छळताहेत – अबू आझमी

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीका केली आहे. दोन ठग लोकांना छळत असल्याची टीका अबू आझमी यांनी केली आहे. सीएए विरोधी मोर्चात महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता.

हम सब एक है…’

या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी, निदर्शकांच्या हाती ‘हम सब एक है…’, ‘आय लव्ह इंडिया’ असं लिहिलेले पोस्टर होते. जवळपास दहा ते बारा हजार एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलनकर्त सहभागी झाले होते. याआधीही ऑगस्ट क्रांती मैदानात अशाप्रकारे आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळेसही, मुस्लिम बांधवांनी, अभिनेते जावेद जाफरी आणि अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी झाली होती.

First Published on: February 15, 2020 8:04 PM
Exit mobile version