सचिन वाझेंना या प्रकरणात अडकवण्यात आलंय, भाऊ सुधर्म वाझेंची प्रतिक्रिया

सचिन वाझेंना या प्रकरणात अडकवण्यात आलंय, भाऊ सुधर्म वाझेंची प्रतिक्रिया

मी शुक्रवारी मुंबईत आलो होतो तेव्हा माझे सचिन वाझेसोबत बोलण झाले होते. या संपुर्ण प्रकरणातच सचिन वाझे चिंतेत पहायले मिळाले. जे वॉट्स एप मॅसेजवर नमुद करण्यात आले आहे, तशीच भावना कुटूंबासोबत बोलून दाखवली असल्याची माहिती सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाझे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. या संपुर्ण प्रकरणात अनेक गोष्टी अनिश्चितपणे घडू शकतात. त्यामुळेच एकंदरीतच त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आम्ही पाहिली असेही सुधर्म वाझे यांनी सांगितले. पण सचिन वाझे एक सक्षम अधिकारी आहेत, त्यामुळेच तपास यंत्रणांना पुर्णपणे सहकार्य करतील असाही विश्वास सुधर्म वाझे यांनी बोलून दाखवला. या संपुर्ण प्रकरणात सचिन वाझेंना अडकवले जात असल्याची भावनाही सुधर्म वाझे यांनी बोलून दाखवली.

सचिन वाझे यांच्या अटकेची माहिती कुटूंबाला देण्यात आली नव्हती. तसेच कोणत्याही तपास यंत्रणेने सचिन वाझे यांच्या कुटूंबाशी संपर्क साधला नव्हता. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणात कुणाशी बोलता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यानिमित्ताने कोणत्या अधिकाऱ्यांना संपर्क साधता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याही घरात चिंतेचे वातावरण असून या संपुर्ण प्रकरणात कुटूंब सचिन वाझे यांच्यासाठीची काळजी करत आहेत. सचिन वाझे यांनी या संपुर्ण प्रकरणात मला अडकवण्यात येत आहे अशी भावना कुटूंबासोबत बोलून दाखवली आहे. त्यामुळेच या प्रकरणात आगामी दिवसात सगळ्याच गोष्टींची अनिश्चितता असल्याचे सुधर्म वाझे म्हणाले.

मुंबईत असताना सचिनसोबत बोलणे झाले होते. त्यावेळी संपुर्ण प्रकरणात अडकवण्यात येत असल्यानेच जगाचा निरोप घेण्याची वेळ आली असल्याची हताश भावना सचिन वाझे यांनी कुटूंबासमोर बोलून दाखवली होती. सचिन वाझे यांनी संपुर्ण प्रकरणात सुरू असलेल्या तपासाच्या पद्धतीवर चिंता व्यक्त करत यापुढच्या काळात अनिश्चितपणे काहीही घडू शकते असा मानस बोलून दाखवला होता. त्यामुळेच एकुणच त्यांच्या मानसिकतेवर कुटूंबाने चिंता व्यक्त केली आहे. सचिन वाझे एक सक्षम अधिकारी आहेत. तसेच तपासामध्ये बुद्धीचातुर्य असणारा असा अधिकारी आहे. परंतु वॉट्स एप मॅसेजमध्ये जी भावना व्यक्त केली आहे, त्यानुसार या संपुर्ण प्रकरणात अनिश्चितता बोलून दाखवली असल्याचे सुधर्म वाझे यांनी सांगितले.

काय आहे सचिन वाझे यांना वॉट्स एप मॅसेज ?

3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली. ती केस अजूनही न्यायप्रविष्ठ आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.” असे धक्कादायक स्टेटस सचिन वाझेंनी आपल्याला व्हॉट्सअॅपला ठेवले आहे.

First Published on: March 14, 2021 1:16 PM
Exit mobile version