नायरच्या डॉक्टर तुपे यांची आत्महत्या प्रेमप्रकरणातून

नायरच्या डॉक्टर तुपे यांची आत्महत्या प्रेमप्रकरणातून

अंत्यसंस्कार करण्याच्या काही क्षणांपूर्वी 'तो' जिवंत झाला

नायर रुग्णालयात भूलतज्ज्ञ असलेले डॉक्टर भीमसंदेश तुपे यांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रेयसीचे लग्न दुसऱ्या तरुणाबरोबर ठरल्याने तुपे अस्वस्थ होते. यातूनच त्यांनी १५ फेब्रुवारीला रुग्णालयात आत्महत्या केली होती.

तुपे यांचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. ती नागपूरमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. यादरम्यान दोघांचे प्रेम जुळले. पण नंतर पुढील शिक्षणासाठी तुपे मुंबईत आले. त्यानंतर फक्त मेसेज व फोनच्या माध्यमाने ते एकमेकांच्या संपर्कात होते.

त्यातच तिचे लग्न ठरल्याचे तुपेंना कळाले. त्यामुळे ते नाराज होते. याचदरम्यान, तुपे यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे तुपे अधिकच अस्वस्थ झाले. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर ते पुन्हा मुंबईस परतले. १५ फेब्रुवारीला त्यांनी कामही केले. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत गेले. पण सकाळी उशीरापर्यंत ते बाहेर आलेच नाही. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पण त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजले नव्हते. पण तपासादरम्यान प्रेमप्रकरणातून त्यांनी स्वतला संपवल्याचे समोर आले आहे.

First Published on: March 2, 2021 12:13 PM
Exit mobile version