LockDown: नालासोपारा आगाराने मारली बाजी; तब्बल १ कोटींहून अधिक महसूल गोळा

LockDown: नालासोपारा आगाराने मारली बाजी; तब्बल १ कोटींहून अधिक महसूल गोळा

टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी तारले आहे. एसटी महामंडळाच्या राज्यभरातील आगारांपैकी एकट्या नालासोपारा आगाराने लॉकडाऊन काळात एक कोटी ६३ लाख ७ हजार ८९९ रुपयांचे महसूल गोळा करून ऐतिहासिक कामगिरी करत राज्यभरात बाजी मारली आहे. नालासोपारा आगारातील आतापर्यंत हे सर्वाधिक जास्त महसूल आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी नालासोपारा आगारातील कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

लॉकडाऊन काळात कोरोना योद्धांना सेवा देण्याचा आम्हाला योग आला. त्यांना अखंडित सेवा देण्याचे काम एसटीच्या तिन्ही विभागाने केले आहे. तसेच एसटी महामंडळाचे व्यस्थापकीय संचालक आणि वाहतूक व्यस्थापक यांच्या मार्गदर्शनामुळे नालासोपारा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांने लॉकडाऊन काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत सार्वधिक महसूल गोळा करून ऐतिहासिक कामगिरी केली.  
– अजित गायकवाड, विभाग नियंत्रक, पालघर विभाग

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले तीन महिने एसटी वाहतूक मुंबई, ठाणे, पालघरचा अपवाद वगळता राज्यात इतरत्र वाहतूक बंद आहे. दररोज अंदाजे २२ कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. संचित तोटा ६ हजार कोटींच्यावर जाऊन पोहोचला आहे. कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने उशिरा वेतन मिळत आहे. अशा संकटाच्या काळातसुद्धा एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील एसटी कर्मचारी आपली सेवा देत आहे. लॉकडाऊन काळात फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या या तीन विभागातून विशेष बस फेऱ्या चालवण्यात येत आहे. मात्र या कठिण परिस्थितीतसुद्धा एसटीच्या पालघर विभागातील नालासोपारा आगाराने लॉकडाऊन काळात १ कोटी ६३ लाख रुपयांचे महसूल गोळा केला आहे. हा महसूल २३ मार्च ते १८ जूनपर्यत या कालावधीत गोळा केला आहे. २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत १३ लाख १६ हजार ७५२ रुपये तर एप्रिल आणि मे या दोन  महिन्यात ९२ लाख ४९ हजार महसूल नालासोपारा आगाराने  जमा केला होता. आता जून महिन्याच्या १८ दिवसात तब्बल ५७ लाख ४२ हजार ५२ रुपयांचा महसूल गोळा करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आतापर्यंत नालासोपारा आगारातील आणि राज्यभरतील आगारातील सर्वाधिक महसूल आहे. नालासोपारा आगारातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रात्र दिवस परिश्रम घेतल्याने हे शक्य झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

नालासोपारा आगार
——————————————-
महिना                        उपन्न
——————————————-
मार्च  २३  ते  ३१       १३,१६,७५२
——————————————–
एप्रिल                      ४१,३४२१७
———————————————
में                          ५१,१४८७८
——————————————-
जून                        ५७,४२०५२
—————————————–
एकूण                     १, ६३, ०७८९९
—————————————-

First Published on: June 19, 2020 7:39 PM
Exit mobile version