सांताक्रुझ-चेंबुर जोडरस्त्याला गोपीनाथ मुंडेंचेच नाव

सांताक्रुझ-चेंबुर जोडरस्त्याला गोपीनाथ मुंडेंचेच नाव

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडला स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र हे नाव दिले असतानाही शिवसेनेच्या नगरसेवकांकडून हे बदलण्याच्या प्रयत्न सुरू आहे. या लिंक रोडवरील पुलाला सेनेच्या नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव तर नगरसेवक आमदार दिलीप लांडे यांनी शहिद प्रथमेश रावराणे यांचे नाव देण्याची मागणी केली. परंतु या लिंक रोडला यापूर्वीच गोपीनाथ मुंडे यांचे नाव दिले असल्याने आयुक्तांनी ही मागणी फेटाळून लावली.

लोकमान्य टिळक टर्मिनस व नेहरुनगर कुर्ला व कुर्ला पश्चिम येथील स.गो.बर्वे मार्ग ते टिळक नगर, अमर महल यांना जोडणार्‍या सांताक्रुझ-कुर्ला लिंक रोडवरील दुमजली उड्डाणपुलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल असे नाव देण्याची शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका प्रविण मनिष मोरजकर यांनी केली आहे.

तर शिवसेनेचे नगरसेवक आमदार दिलीप लांडे यांनी कुर्ला पश्चिम येथील कुर्ला-सांताक्रुझ टर्मिनस रोड ते स.गो.बर्वे यांना जोडणार्‍या पुलास मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे असे नाव देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ९ ऑक्टोबर २०१८ रोजी या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडला गोपिनाथ मुंडे सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड असे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे या जोड रस्त्याचे नामकरण झालेले असतानाच मोरजकर आणि लांडे यांनी या मार्गावरील पुलाला अनुक्रमे बाळासाहेब ठाकरे आणि मेजर कौस्तुभ राणे यांचे नाव देण्याची मागणी केली. परंतु ही उड्डाणपुल सांताक्रूझ-चेंबूर लिंक जोड रस्त्याचाच भाग आहे. त्यामुळे ही नावे देता येत नसल्याचे कारण देत प्रशासनाने हे दोन्ही नामकरणांचे प्रस्ताव फेटाळून लावले.

First Published on: January 22, 2020 2:16 AM
Exit mobile version