पतंग प्रेमींसाठी डोंबिवलीत खास ‘नमो पतंग’ महोत्सव

पतंग प्रेमींसाठी डोंबिवलीत खास ‘नमो पतंग’ महोत्सव

पतंग प्रेमींसाठी खास डोंबिवलीत 'नमो पतंग' महोत्सवाचे आयोजन

मकर संक्रांतीचा सण म्हणजे उत्तरायणाला सुरुवात. तिळगूळ, काटेरी हलवा यासोबत आकाशात पतंग उडविण्याचा थरार. पतंग बदवणे, कापणे, मांजा फिरकीचा गुंता थोडक्यात बाळ गोपाळांच नव्हे तर आबालवृद्धांना पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद म्हणजेच संक्रांतीचा सण. याच मकर संक्रांतीचे औचित्य साधून डोंबिवलीत आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रथमच भव्य अशा नमो पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवार १५ जानेवारीला सावळाराम क्रीडा संकुलात या पतंग महोत्सवाचे आयोजन भाजपा गुजराती आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

३० फुटांचा पतंग 

केवळ ठाणे जिल्हाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भव्य पतंग महोत्सव ठरणार आहे. कारण या ठिकाणी महाकाय आकाराचे पतंग उडविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ३० फुटांचा ५०० फुगे असलेला पतंग, रात्रीच्या अंधारात चकाकणारे एलईडी लाईट पतंग, मेट्रो ट्रेन पतंग असे वैशिष्ट्यपूर्ण पतंग दिसणार आहेत. याच बरोबर हे पतंग बदविण्याकरिता डहाणूवरुन खास तज्ज्ञ येणार आहेत. रिमोट कंट्रोलच्या द्वारे पतंग उडविण्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

डोंबिवलीकर पतंग प्रेमींसाठी नमो महोत्सवात पतंग, मांजा आणि अन्य आवश्यक सामुग्री मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पतंग उडविण्याच्या, काटाकाटीच्या स्पर्धा आणि अन्य आकर्षण म्हणजे जादूचे प्रयोग, डीजे, मून वॉकर असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. १५ जानेवारीला सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत नमो पतंग महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.


हेही वाचा – मकरसंक्रात स्पेशल : जाणून घ्या ‘भोगी’चे महत्व


 

First Published on: January 13, 2020 3:51 PM
Exit mobile version