आई-वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर अनिवार्य आहे का? – नाना पटोले

आई-वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर अनिवार्य आहे का? – नाना पटोले

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज सकाळीच गुजरातमध्ये आई हिराबेन मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींनी वयाच्या १०० व्या वर्षात आज पदार्पण करत असून त्यानिमित्तच ही विशेष भेट त्यांनी घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर फोटोशूटवरुन महाराष्ट्र काँग्रसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका केली आहे.

हीराबा या नावाने अनेकजण मोदींच्या मोतोश्री हिराबेन यांना ओळखतात. पंतप्रधान मोदींनी आईच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केलेल्या काही फोटोमध्ये ते आईचे पाय धुताना दिसत आहेत. मोदींनी या फोटोना आज मी आईचे आशिर्वाद घेतले. आज ती १०० व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे, असे कॅप्शन दिले आहे. कॅप्शनसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी हिराबा बसलेल्या खुर्ची जवळ बसलेले दिसत असून ते आईशी चर्चा करत आहेत. एका फोटोमध्ये त्यांना आई गोड पदार्थ खावू घालताना दिसत आहे. तर अन्य एका फोटोत ते आईचे आशिर्वाद घेताना दिसत आहेत.

मोदींनी शेअर केलेल्या या फोटोंवर नाना पटोलेंनी अप्रत्यक्षपणे टिका केली आहे. आई वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर असणे अनिवार्य आहे का?, असा खोचक प्रश्न पोस्टमधून विचारला आहे. पुढे पटोलेंनी, असो! आईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!, असेही म्हटले आहे.

First Published on: June 18, 2022 5:20 PM
Exit mobile version