“नारली पुनवेच्या सणाला, जाऊ दर्याच्या पुजेला” कोळीबांधवांचा सण म्हणजे नारळीपौर्णिमा…

“नारली पुनवेच्या सणाला, जाऊ दर्याच्या पुजेला” कोळीबांधवांचा सण म्हणजे नारळीपौर्णिमा…

“नारली पुनवेच्या सणाला, जाऊ दर्याच्या पुजेला”

विशेषतः समुद्र किनारी राहणारे बांधव विशेषतः कोळी बांधव साजरा करत असतात. समुद्राशी निकटचा संबंध या कोळी बांधवांचाच येत असल्याने हा सण मोठया उत्साहाने कोळीवाडयांमधे साजरा होतो. अर्थात नारळी पौर्णिमा हा कोळीवाड्यांतील लोकांचा महत्त्वाचा सण. दर्याला सोन्याचं नारळ अर्पण या दिवशी केले जाते. वर्षभर भरपूर मासे मिळण्यासाठी प्रार्थना करायची आणि पारंपारिक गोडधोड पदार्थ करून मनसोक्त नाच गाण्यांचा जल्लोष म्हणजेच नारळी पौर्णिमा…

कोळीबांधवांचा लाडका सण

कोळीबांधव उत्सवप्रिय असून होळी आणि नारळीपौर्णिमा हे त्यांचे अत्यंत लाडके सण असतात. मुंबईसारख्या शहरात देखील हा सण उत्साहात कोळीबांधव साजरा करताना दिसतात. मुंबईतील मुंबापुरीत मोठया संख्येने कोळीवाडे असून मुंबईचा मुळ रहिवासी म्हणूनच कोळयांची ओळख आहे.

श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा

मुंबईच्या परिसरात साधारण ३४ कोळीवाडे आहेत वेसावे, मढ, भाटी, कुलाबा, वरळी, माहिम, जुहु, मालवणी, गोराई, माहुल, धारावी हे महत्वाचे कोळीवाडा असल्याची माहिती आहे. हे कोळी बांधव श्रावण पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. वरूणदेव हा पश्चिम दिशेचा रक्षक आहे त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो.

सोन्याचं नारळ समुद्रात अर्पण 

नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव अत्यंत पारंपारीक पध्दतीने साजरा करतात. कोळी बांधव आपला पारंपारीक वेश परिधान करतात. कमरेला रूमाल अंगात टिशर्ट आणि डोक्याला टोपी आणि स्त्रिया भरजरी लुगडे परिधान करून अक्षरशः सोन्याने मढतात. कोळी बांधव सायंकाळच्या वेळेला समुद्राची पुजा करतात. दर्याला सोन्याचा नारळ अपर्ण करून भक्तिभावाने पुजा करतात. सोन्याचं नारळ म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टण गुंडाळले जाते आणि तो नारळ सागराला अर्पण केला जातो. त्यानंतर गोडाधोडाचा नैवैद्य दाखवून सागराला देखील गार्हाण घातलं जातं.

रंगबेरंगी बोटी सजवून बोटींची केली जाते पुजा

कोळी बांधव आपापल्या बोटी रंगरंगोटी करून सजवितात. बोटींना पताका लावुन सुशोभित केल्या जाते. बोटींची पुजा करून त्यांना मासेमारीकरता समुद्रात लोटतात.
कोळी स्त्रिया सागराला प्रार्थना करतात. आमच्या बोटीवर वर्षभर भरपुर मासोळी गावुदे (सापडु दे) समुद्रात माझा घरधनी येईल त्यावेळी त्याचे रक्षण कर. कोणतेही संकट नको येऊ देऊस. तसेच कोळी बांधव ज्यावेळी मासेमारीकरता समुद्रात रवाना होतो त्यावेळी कोळी स्त्रियांची संपुर्ण मदार सागरावर असते. धन्याचे रक्षण कर म्हणुन त्या मनोमन दर्याला आराधना करतात.

पारंपारिक नैवेद्य दाखवण्याची प्रथा

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने बनवलेल्या खास नारळाच्या करंजा, नारळीभाताचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो. अनेक कोळी पाडयांवर रावस माश्याचा तळलेला तुकडा देखील नैवेद्यामधे ठेवला जातो. त्यानंतर आपापल्या कोळी पाडयांवर पारंपारिक गीते गायली जातात. मिरवणुका काढल्या जातात. नारळ फोडण्याचा खेळ खेळला जातो. विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. कोळी स्त्रिया भरजरी कपडे घालून पारंपारीक नृत्य देखील करताना दिसतात. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने साधेपणाने हा सण साजरा करणार असल्याचे कोळी बांधवांकडून सांगितले जात आहे.


RakshaBandhan 2020: रक्षाबंधनसाठी पूजेची थाळी अशी तयार करा

First Published on: August 3, 2020 8:44 AM
Exit mobile version