विक्रोळीत महिलांची ‘नारळ फोडी’

विक्रोळीत महिलांची ‘नारळ फोडी’

विक्रोळीत महिलांची 'नारळ फोडी'

श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने कोळी बांधवांचा म्हणून मानला जातो. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात. समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. या दिवशी नारळ फोडण्याची देखील प्रथा असते. एकमेकांच्या हातातील नारळ फोडून नारळी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आजही कायम आहे. आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने विक्रोळीत कन्नमवार नगरात महिलांनी नारळी पौर्णिमा सण नारळ फोडी खेळखेळून साजरा केला.

नारळ फोडी स्पर्धा

श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर ओसरल्यामुळे कोळी बांधव समुद्रात मोठ्या उत्साहाने जातात. समुद्र शांत व्हावा, त्याचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी लोककलेच्या माध्यमातून कोळी बांधव नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करतात. तर दुसरीकडे एकमेकांच्या हातातील नारळ फोडून नारळी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आजही मुंबईत कायम आहे. यामध्ये नारळाची पारख करण्यापासून तो फोडण्यासाठी विविध शक्कल या स्पर्धे दरम्यान लावावी लागते. नारळी पौर्णिमा निमित्ताने विक्रोळी कन्नमवार नगरात सक्षम महिला मंडळाच्या अध्यक्षा पुजा दळवी आणि मंडळातील महिलांनी नारळ फोडी हा खेळ एकमेकांच्या हातातील नारळ फोडून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे.


हेही पहा – एका बुक्कीत नारळ फोडण्याची परंपरा


First Published on: August 14, 2019 7:31 PM
Exit mobile version