ठाण्याच्या वीणा कोण्णूरने पटकावले रौप्य पदक

ठाण्याच्या वीणा कोण्णूरने पटकावले रौप्य पदक

६५ वी राष्ट्रीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत ठाण्याच्या वीणा कोण्णूर हिने रौप्य पदक पटकावले आहे. २ जानेवारी ते ९ जानेवारी या कालावधीत दिल्लीतील छत्रसाल स्टेडियम येथे या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत विविध १५ राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातून १९ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात एरो सिकई या इव्हेंटमध्ये वीणा कोण्णूर हिने रौप्यपदक पटकावले.

वीणा ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असून ती वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. महाराष्ट्र कराटे स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ ठाणे या संघटनेची ती खेळाडू आहे. तिच्या या यशामागे तिचे शाळेचे क्रीडा शिक्षक रोहिणी ठोंबे, आई सुमंगला, वडील श्रीधर आणि ठाणे जिल्ह्याचे सिकई मार्शल आर्टचे अध्यक्ष मास्टर रॉकी डिसोझा तसेच तिचे मुख्य प्रशिक्षक शिहान नासिर मुलानी, उपप्रशिक्षक कल्पेश चिरमे आणि महाराष्ट्र राज्याचे कोच विजय तांबडकर, काजल मेश्रम या सर्वाचे श्रेय असल्याचे ती सांगते. तिच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालय, क्रीडा संघटना आणि ठाण्यातील सर्वच क्षेत्रातून तिचे कौतुक होत आहे.

First Published on: January 19, 2020 1:22 AM
Exit mobile version